वायू जीवशास्त्रावरील संशोधन उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:41 PM2018-01-29T22:41:11+5:302018-01-29T22:41:30+5:30
वायुजीवशास्त्र विषय आंतरशिस्त विद्याशाखेचा असून, या महत्वपूर्ण विषयावर देशभरात संशोधन सुरु आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वायुजीवशास्त्र विषय आंतरशिस्त विद्याशाखेचा असून, या महत्वपूर्ण विषयावर देशभरात संशोधन सुरु आहे. विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून वायुजीवशास्त्रावरील संशोधन उदयोन्मुख संशोधकांसमोर येऊन त्यावर सखोल विचारमंथन होईल आणि वायूजीवशास्त्र विषयाची विस्तारित क्षितिजे संशोधकांसमोर येतील, असे प्रतिपादन तुमकूर विद्यापीठ, कर्नाटकचे माजी कुलगुरु ए.एच. राजासाब यांनी केले.
संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने २० व्या वायूजीवशास्त्रावर राष्ट्रीय परिषद ‘ऐअरबोर्न पोलन अॅण्ड स्पोअर्स असेसमेन्ट, इम्पॅक्ट अॅण्ड स्कोप’ या विषयावर आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटनपर सत्रात ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर, उद्घाटक तथा बीजभाषक बंगलोर विद्यापीठ, बंगलोरचे माजी कुलगुरू श्रीपाद एन. आगाशे, इंडियन ऐरोबॉयलॉजीकल सोसायटीचे अध्यक्ष के.एल. तिवारी, सोसायटीचे कोषाध्यक्ष व सचिव एस.बी.जोगदंड, माजी अध्यक्ष एस.टी. टिळक, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख जयकिरण तिडके व सहआयोजक सचिव.व्ही.एन. नाठार उपस्थित होते. संचालन सिमित रोकडे यांनी, आभार प्रशांत गावंडे यांनी मानले.