सकाळी घेतली लस, दुपारी झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:27+5:302021-09-15T04:17:27+5:30

दर्यापूर : तालुक्यातील अंतरगाव शिवाजी येथील ५५ वर्षीय इसमाने सकाळी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि दुपारी त्यांचा राहत्या घरी ...

Vaccinated in the morning, died in the afternoon | सकाळी घेतली लस, दुपारी झाला मृत्यू

सकाळी घेतली लस, दुपारी झाला मृत्यू

googlenewsNext

दर्यापूर : तालुक्यातील अंतरगाव शिवाजी येथील ५५ वर्षीय इसमाने सकाळी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि दुपारी त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. शंकर वासुदेव केकाण असे मृताचे आहे.

शंकर केकाण यांचा पहिला डोसचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी गावात आयोजित शिबिरात सकाळी १० वाजता कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर बाथरूम गेले असता पाय घसरून पडल्याने त्यांना जखमी अवस्थेत येवदा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. केकाण यांना हृदय विकाराचा त्रास असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. परंतु त्या इसमाचा नेमका मृत्यू कशाने झाला याचा उलगडा शवविच्छेदनानंतरच होणार आहे.

कोट

अंतरगाव येथील शिबिरात १२० जणांचे लसीकरण झाले. एकालाही त्रास झाला नाही. मृता देण्यात आलेल्या व्हायलमधून इतर नऊ जणांना लस दिली असताना कुणालाही त्रास झाला नाही. मृताला हृदय विकाराचा आजार असण्याची शक्यता वाटते. शवविच्छेदनानंतरच वास्तव पुढे येईल.

- डॉ. संजय पाटील, तालुका वैधकीय अधिकारी, दर्यापूर

Web Title: Vaccinated in the morning, died in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.