पेट्रोल पंपावरील १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:03+5:302021-06-23T04:10:03+5:30
अमरावती : संपूर्ण कोरोनाकाळात अविरत सेवा देणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण मंगळवारी दंत महाविद्यालय येथे स्वतंत्र ...
अमरावती : संपूर्ण कोरोनाकाळात अविरत सेवा देणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण मंगळवारी दंत महाविद्यालय येथे स्वतंत्र शिबिराद्वारे पार पडले. जिल्ह्यातील १०० कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितिन धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे रविराज देशमुख, आयओसीएलचे विक्री अधिकारी भावेश सिंह, डॉ. मिलिंद नाफडे, डॉ. किशोर अंबाडेकर, डॉ स्वाती कोवे, गजेश सिंह, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर, नर्स आणि सहयोगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सुशीलदत्त बागडे यांनी केले. लसीकरणासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.