तिसऱ्या दिवशी ५७५ जणांंचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:34+5:302021-01-21T04:13:34+5:30

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसरे दिवसी पाच केंद्रांवर ५७५ हेल्थ केअर वर्कर्सचे लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी ...

Vaccination of 575 people on the third day | तिसऱ्या दिवशी ५७५ जणांंचे लसीकरण

तिसऱ्या दिवशी ५७५ जणांंचे लसीकरण

Next

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसरे दिवसी पाच केंद्रांवर ५७५ हेल्थ केअर वर्कर्सचे लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली. यापैकी तिवसा बुथवर एकाला घाबरल्यासारखे वाटल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याचे ते म्हणाले.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी कोविन ॲपमध्ये लाभार्थीची नावे मिसमॅच होत असल्याने मेसेज केल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाविना परतावे लागले. त्यामुळे बुधवारी याविषयी खबरदारी घेण्यात आली. विहीत वेळेत येथील डॉ. पंजाबराव देशमुख वौद्यकीय महाविद्यालयात १२०, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या केंद्रात ११२, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात १३७, अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर १३८ व अंजनगाव बारी येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात ६८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटच्या लाभार्थीसाठी असलेल्या व्हायलमधील काही डोज वाया जात असल्याचे ते म्हणाले.

बॉक्स

बुधवारी ५०० पेक्षा अधिक एसएमएस

मंगळवारी अर्धे लाभार्थी लसीकरणाविना परत गेल्यामुळे बुधवारी ५०० वर लाभार्थींना एसएमएस पाठविण्यात आले व कोविन ॲपवर नावे मिसमॅच व्हायची, हा तांत्रिक दोष जागीच निवारण्यात आल्याने कुठलाच तांत्रिक दोष बुधवारी आलेला नाही. त्यामुळे उपस्थितांपैकी सर्वांनाच लस देण्यात आल्याचे डीएचओ रणमले यांनी सांगितले.

Web Title: Vaccination of 575 people on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.