चांदूर रेल्वे शहरातील ७५ टक्के अपंग व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:42+5:302021-07-25T04:11:42+5:30
साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम, ने-आण करण्यासाठी उपलब्ध केले होते वाहन चांदूर रेल्वे : साहस संस्थेच्या अभियानांतर्गत चांदूर रेल्वे ...
साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम, ने-आण करण्यासाठी उपलब्ध केले होते वाहन
चांदूर रेल्वे : साहस संस्थेच्या अभियानांतर्गत चांदूर रेल्वे शहरातील ७५ टक्के अंध, अपंग व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. संस्थेतर्फे ने-आण करण्यासाठी वाहन उपलब्ध केले होते, अशी माहिती अध्यक्ष चेतन भोले यांनी दिली. संस्थेला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल्ल मरसकोल्हे व लसीकरण विभागाच्या प्रमुख प्रणाली गोरडे यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे महेश राऊत, सौरभ इंगळे, गजानन ठाकरे, दत्ता धामणकर, अमित बागमार, संजय शिंदे, शंतनु कदम, सचिन डोक, रोहित इंगोले, रोशन समुंद, साहस नारीशक्ती अध्यक्ष रेखा औंधकर, अश्विनी विश्वकर्मा, रूपाली दिघडे, मोहिनी उपरीकर, आचल प्रधान, भारती इंगोले आदींनी परिश्रम घेतले आहे. या चमूने अगोदरच्या दिवशी अपंगांच्या घरी जाऊन लसीकरणाची माहिती दिली व जनजागृती केली. दुसऱ्या दिवशी जनसेवा रथाच्या सहाय्याने लसीकरणासाठी दिव्यांगांना केंद्रावर आणले व घरापर्यंत परत सोडले.