बडनेऱ्याच्या मोदी दवाखान्यात लसीकरणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:30+5:302021-04-19T04:12:30+5:30
बडनेरा : स्थानिक मोदी दवाखान्यात गेल्या दीड महिन्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद लाभत असताना लसीचा साठा संपल्याने ...
बडनेरा : स्थानिक मोदी दवाखान्यात गेल्या दीड महिन्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद लाभत असताना लसीचा साठा संपल्याने शनिवारी नागरिकांना परत जावे लागले.
एक लाख लोकवस्तीच्या बडनेरा शहरातील नव्या वस्तीच्या मोदी दवाखान्यात व जुन्या वस्तीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली. येथे लस टोचून घेण्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. प्रामुख्याने मोदी दवाखान्यात दरदिवशी बरेच लोक कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लस टोचून घेत होते. आता तुटवड्यामुळे लसीकरणाला ब्रेक मिळाला आहे. लवकरच लसीचा पुरवठा मिळेल, असेही सांगण्यात आले.
जुन्या वस्तीतील आरोग्य केंद्रात मात्र लस सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने नागरिकांचा लसीकरणाकडे कल वाढला आहे. बऱ्याच नागरिकांच्या दुसऱ्या डोजला सुरुवात झाली आहे. तेव्हा बडनेरातील केंद्रांवर लसीचा पुरवठा सारखा झाला पाहिजे, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.