हिपॅटायटीस डे निमित्त लसिकरण, रक्‍त तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:57+5:302021-07-29T04:13:57+5:30

भूक मंदावणे, अंगावरील त्वचा आणि डोळे पिवळे होणे (कावीळ), मूत्राचा रंग गडद असणे, पोटात दुखणे, सांधे दुखणे, थकवा, ...

Vaccination for Hepatitis Day, Blood Testing Camp | हिपॅटायटीस डे निमित्त लसिकरण, रक्‍त तपासणी शिबिर

हिपॅटायटीस डे निमित्त लसिकरण, रक्‍त तपासणी शिबिर

Next

भूक मंदावणे, अंगावरील त्वचा आणि डोळे पिवळे होणे (कावीळ), मूत्राचा रंग गडद असणे, पोटात दुखणे, सांधे दुखणे, थकवा, अचानक वजन कमी होणे, ताप, मळमळ, उलट्या ही हिपॅटायटीस ‘बी’ व ‘सी’ च्या संसर्गाची लक्षणे आहेत. या सामान्यपणे दिसणाऱ्या लक्षणांबरोबरच, काही वेळा यकृत खराब झाल्यावरच दिसणारीही काही लक्षणे असतात. हिपॅटायटीस ए, बी आणि इ यांची बाधा झालेल्या काही रुग्णांची प्रकृती अचानक खालावते. त्यांना तीव्रपणे कावीळ होऊन चक्कर येते व ते कोमामध्ये जातात. त्यांच्या यकृतामध्ये तीव्र स्वरुपाचा बिघाड झालेला असतो. अनेकदा, हिपॅटायटीस ‘बी’ वा ‘सी’ यांची लागण झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा ती दिसू लागतात, तेव्हा त्यांचे यकृत ८० टक्के खराब झालेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Vaccination for Hepatitis Day, Blood Testing Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.