तपोवनातील कुष्ठरुग्णांसाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:38+5:302021-03-28T04:13:38+5:30
अमरावती : विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथील दधिची रुग्णालयात शनिवारपासून कुष्ठरुग्णांसाठी कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली ...
अमरावती : विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथील दधिची रुग्णालयात शनिवारपासून कुष्ठरुग्णांसाठी कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुढाकर घेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांना सूचना केल्या होत्या.
या संस्थेत ३५० वर कुष्ठरुग्ण व कुष्ठबाधित निवासी कार्यकर्ते आहेत. काही कारणांमुळे त्यांना आधारकार्ड मिळालेले नाहीत. याशिवाय संस्थेतील अर्धेअधिक रुग्ण शहरातील कोरोना लसीकरण केंद्रात जाऊन तेथे काही कारणास्तव थांबू शकत नाहीत. येथे मोबाईल नसणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे तपोवनातील कुष्ठरुग्ण लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी संस्थेच्या रुग्णालयात शिबिर लावून सर्वांना लसीकरणाची भावना तपोवन संस्थेचे अध्यक्ष अतुल आळसी, सचिव वसंत बुटके, वीणा भगत आदींनी आयुक्तांकडे व्यक्त केली होती. या सर्व लाभार्थ्यांना आता किविशिल्ड या लसीचा लाभ देण्यात आला.