शहरातील याठिकाणी होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:00+5:302021-05-09T04:14:00+5:30

आयसोलेशन दवाखाना या केंद्रावर कोविशिल्‍ड ही लस तर मनपा दवाखाना सबनिस प्‍लॉट, शहरी आरोग्‍य केंद्र विलास नगर, मनपा दवाखाना ...

Vaccination will take place here in the city | शहरातील याठिकाणी होणार लसीकरण

शहरातील याठिकाणी होणार लसीकरण

Next

आयसोलेशन दवाखाना या केंद्रावर कोविशिल्‍ड ही लस तर मनपा दवाखाना सबनिस प्‍लॉट, शहरी आरोग्‍य केंद्र विलास नगर, मनपा दवाखाना बिछुटेकडी को-व्‍हॅक्सिन ही लस १८ ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस उपलब्ध होणार आहे. या केंद्रांवर १० मे साठी नोंदणी ९ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. पीडीएमएमएसी केंद्रावर को-व्‍हॅक्सिन ही लस फक्त १८ ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस उपलब्ध होणार असून ९ मे साठी नोंदणी ९ मे रोजी सकाळी ७ वाजता सुरू होईल. याशिवाय ज्येष्ठ नागरीक वार्ड (एनसीडी) येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशील्डचा पहिला डोज दिल्या जाणार आहे.

Web Title: Vaccination will take place here in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.