तरुणाईचे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:06+5:302021-05-03T04:08:06+5:30
अमरावती : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला शनिवारपासून आरंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ नागरिक वॉर्डातील लसीकरण ...
अमरावती : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला शनिवारपासून आरंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ नागरिक वॉर्डातील लसीकरण केंद्रात अमरावतीच्या रसिका खाटके या २४ वर्षीय तरुणीने प्रथम लस घेतली.
जिल्हा रुग्णालयाचा ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरूड ग्रामीण रुग्णालय व अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यातील अमरावती शहरातील तीन केंद्रांवर शनिवारपासून युवकांचे लसीकरण सुरू झाले. उर्वरित दोन केंद्रांवर रविवारपासून लसीकरण सुरू झाले. कोविन ॲपवर नोंदणीकृत तरुण गटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर लसीच्या पुरवठ्यानुसार लसीकरणाचा विस्तार करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्याला साडेसात हजार लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.
बॉक्स
विना ऑनलाईन नोंदणी लसीकरण नाही
या वयोगटातील नागरिकांनी कोविनच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक व वेळ कळविली जाईल. तसा संदेश संबंधिताला प्राप्त होईल. त्यामुळे कुणीही नोंदणी न करता थेट येऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. विनानोंदणी लसीकरण होणार नाही. लसीकरणाबाबत नवी केंद्रे आदींबाबत स्पष्ट सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
बॉक्स
असे झाले लसीकरण
०००००००००
००००००००००
०००००००००००