कोरोना लसीकरणासाठी पर्यायी व्यवस्थेतून लसीची तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:56+5:302021-04-30T04:15:56+5:30

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत जात आहे. अशातच लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता ...

Vaccine compromise from alternative arrangements for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी पर्यायी व्यवस्थेतून लसीची तडजोड

कोरोना लसीकरणासाठी पर्यायी व्यवस्थेतून लसीची तडजोड

Next

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत जात आहे. अशातच लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता लसीकरणासाठी आरोग्य विभागाला तडजोड करावी लागत आहे. लसीचा कमी वापर तसेच कमी मागणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस परत बोलावून सदर लसीचा साठा ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी आहे अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात लोणी, धामक, नांदगाव खंडेश्वर पापळ यासह इतर काही आरोग्य केंद्रातून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याने येथील लसी परत केल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र, आरोग्य विभागाला लसीच्या पर्यायी व्यवस्थेसाठी तडजोड करावी लागत असल्याची वास्तविकता आहे. वरील काही आरोग्य केंद्रांना त्यानुसार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तिचे लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. नागरिकांमध्ये लसीबाबत अद्याप तत्परता झालेली दिसून येत नाही. अनेक आरोग्य केंद्रांत लसीसाठी रांगा लागलेल्या आहेत. हे विपरीत चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अनेक आरोग्य केंद्रांवर नागरिक रिकाम्या हाताने परत जात आहेत. मात्र काही ठिकाणी लस असूनसुद्धा उपयोगात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था करून लसीकरणावर भर दिला आहे.

कोट

काही प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीची अतिशय कमी मागणी आहे. मात्र, जेथे लसीचा साठा आहे त्या केंद्रातून लसी परत बोलावून त्या लसी ज्या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत आहे अशा आरोग्य केंद्रांना पाठविण्यात येत आहे. लस संपल्यास राज्य शासनाला पुन्हा साठा पाठविला जातो. त्यामुळे काही आरोग्य केंद्रांतून पर्यायी व्यस्थेचा हा एक भाग आहे.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Vaccine compromise from alternative arrangements for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.