लसीचा साठा संपला, १२५ केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:35+5:302021-04-19T04:11:35+5:30

अमरावती : जिल्ह्याला प्राप्त कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील १२५ लसीकरण केंद्रांना टाळे लावण्याची वेळ प्रशासनावर आलेली ...

Vaccine stocks run out, avoid 125 centers | लसीचा साठा संपला, १२५ केंद्रांना टाळे

लसीचा साठा संपला, १२५ केंद्रांना टाळे

Next

अमरावती : जिल्ह्याला प्राप्त कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील १२५ लसीकरण केंद्रांना टाळे लावण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. सायंकाळपर्यंत पुरवठा होईल व सोमवारपासून काही केंद्र तरी सुरू होतील, या आशेवर आरोग्य विभाग आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना या अर्थाने जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झालेले आहे. या कालावधीत कोविशिल्ड १ लाख ९५ हजार व कोव्हॅक्सिनचे ५४,९२० डोस जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत. आता चार टप्प्यात लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक यासाठी पुढाकार घेत असताना व केंद्र शासनाने लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र, लसीअभावी जिल्ह्यातील १२५ केंद्र बंदची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.

पहिल्या टप्प्यात हेल्थ लाईन वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती तर चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कोमार्बिड आजाराच्या व्यक्तींचे लसीकरण होत आहे. ग्रामीण सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑनलाईन यंत्रणा उभारून नोंदणी व लसीकरणाची माहिती पोर्टलवर भरण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, लसीचा साठा संपल्याने आता या केंद्रांवर तसे बोर्ड लावण्यात आले असल्याने ज्येष्ठांना परत जावे लागत आहे.

मुळात लसीकरणाचे नियोजन चुकले आहे. राजकारणात मात्र, एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. विभागाच्या मुख्यालयी लसीचा साठा नाही. जिल्ह्यात साडेचार लाख डोसची मागणी केली असतांना मागील आठवड्यात कोविशिल्डचे २० हजार डोस देण्यात आले. कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा झाल्याने हा साठा चार दिवसांपूर्वीच निरंक झालेला आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा झाल्यानंतरच आता काही केंद्र सुरू होणार आहेत.

बॉक्स

लसीकरणात ज्येष्ठांचा पुढाकार अधिक

जिल्ह्यात २,२१,०१२ व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. यात १,०७,७०० व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. यात १,०३,९८३ व्यक्तींनी पहिला डोस घेतला व ३,७१७ ज्येष्ठांनी दुसराही डोस घेतलेला आहे. यात ९१,१३० नागरिकांनी कोविशिल्ड, तर १६,५७० नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

बॉक्स

असे झाले लसीकरण

हेल्थ केअर वर्कर : आतापर्यंत २८,१०२ जणांचे लसीकरण झाले. यात १७,७२८ व्यक्तींनी पहिला, तर १०,३७४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला.

फ्रंटलाईन वर्कर : एकूण २४,९७८ जणांचे लसीकरण झालेले आहे. यात १७,५६३ व्यक्तींनी पहिला व ७,४१५ जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे.

४५ वर्षांवरील व्यक्ती : यात ६०,२३२ व्यक्तींचे लसीकरण झाले. पहिला डोस ५८,३३२ व दुसरा डोज १,९०० व्यक्तींनी घेतलेला आहे.

पाईंटर

प्राप्त डोज : २,५०,०००

कोविशिल्ड : १,९५,०८०

कोव्हॅक्सिन : ५४,९२०

झालेले लसीकरण :२,२१,०१२

पहिला डोस : १,८७,५४४

दुसरा डोस : ३३,४६८

कोट

प्राप्त लसीचा साठा संपल्याने जवळपास सर्वच केंद्र बंद आहेत. रविवारी उशिरापर्यंत दोन्ही लसींचे काही डोस मिळण्याची शक्यता आहे.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

बॉक्स

उशीरा ००० डोज प्रााप्त

०००००००

०००००००

००००००

Web Title: Vaccine stocks run out, avoid 125 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.