वरुडातून चंदन तस्कराला अटक
By admin | Published: April 15, 2015 12:11 AM2015-04-15T00:11:26+5:302015-04-15T00:11:26+5:30
वरुड तालुक्यातून चंदन तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन सापळा रचून एका वाहनातून दोन ..
दोन किलो चंदन जप्त : वरुड पोलिसांची कारवाई
वरुड : वरुड तालुक्यातून चंदन तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन सापळा रचून एका वाहनातून दोन किलो चंदनासह आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची न्यायालयाने जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
पोलिसांनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोेपीचे नाव नामदेव गजानन बावणे (२५ रा. आठवडी बाजार आष्टी जि. वर्धा) असे आहे. सदर आरोपी वरुड येथून आष्टीकडे प्रवाशी वाहन एम.एच.२७ए.आर.९८२९ यामध्ये बसून चंदन घेऊन जात असल्याची माहिती वरुड पोलिसांना मिळाली. यावरुन १३ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास राजुरा नाका परिसरात प्रवासी वाहन थांबवून तपासणी केली. नामदेव गजानन बावणे २५ याचेकडे एका बॅगेत दोन किलो चंदन आढळून आले. आरोपी विरुध्द वरुड पालिसांनी भारतीय वनकायदा भादंवि २६/१ ४१,४२ मुंबई कायदा नियम ६६/१२९ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.
सदर आरोपीला वरुड न्यायालयाने जिल्हा मध्यवती कारागृहात रवानगी केली. ही कारवाई ठाणेदार अर्जून ठोसरे यांच्या मार्गदर्षनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चित्तरंजन चांदुरे, शिवा आठवले, योगेश नेवारे, रुपेश येरणे, योगेश ढंगार आदींनी केली. (तालुका प्रतिनीधी )