वैभव पाटील यांचा अखेर राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:57+5:302021-06-20T04:09:57+5:30
परतवाडा : अचलपूर मार्गावरील एलआयसी चौकात खासगी दवाखाना असलेल्या डॉ. वैभव पाटील यांनी अखेर शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील पदाचा राजीनामा ...
परतवाडा : अचलपूर मार्गावरील एलआयसी चौकात खासगी दवाखाना असलेल्या डॉ. वैभव पाटील यांनी अखेर शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या खासगी दवाखान्याचे फलक हटविले आहे.
मोर्शी येथील शिक्षिकेच्या नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीला सुरुवात झाली आहे. मोर्शी येथील प्रतिभा टिपरे नामक शिक्षिकेवर उपचार करताना योग्य निदान न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद परतवाडा पोलीस ठाणे व आरोग्य मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. हे सर्व प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. वैभव पाटील यांनी गत आठवड्यात उपजिल्हा रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बॉक्स
उपजिल्हा रुग्णालयातून राजीनामा
या संपूर्ण प्रकरणात ‘लोकमत’ने चौकशी केली असता, डॉ. वैभव पाटील हे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना त्यांचा खासगी दवाखानाही एलआयसी चौकात असल्याचे उघड झाले होते. दुसरीकडे कोरोना संदर्भात उपचाराचे आदेश नसताना त्यांनी संबंधित रुग्णांवर उपचार केला. त्यांच्या रुग्णालयाला कुठल्याच प्रकारची परवानगी नसल्याचेही पुढे आले होते. अग्निशमन विभागाचेसुद्धा ऑडिट नव्हते. लोकमतच्या वृत्तानंतर परवानगीचे पत्र अचलपूर नगरपालिकेला दाखल करण्यात आले.
बॉक्स
जिल्हाधिकारी व पोलिसांकडून चौकशी
प्रतिभा टिपरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने परतवाडा पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून डॉक्टरांमार्फत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. राजीनामानंतर पुन्हा ते येथे रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती आहे.
कोट
उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. वैभव पाटील यांनी गत आठवड्यात राजीनामा दिला आहे.
- सुरेंद्र ढोले,
वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय अचलपूर