मद्यधुंद पोलिसाची स्कूल व्हॅनचालकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:11 PM2018-12-30T22:11:18+5:302018-12-30T22:12:36+5:30

क्षुल्लक कारणावरून एका स्कूल व्हॅनचालकास दारुड्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे शनिवारी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. सदर दारुड्या पोलिसावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

Vaishlechas suffers from drunken school in Drunk School | मद्यधुंद पोलिसाची स्कूल व्हॅनचालकास बेदम मारहाण

मद्यधुंद पोलिसाची स्कूल व्हॅनचालकास बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देग्रामस्थांचा ठाण्याला घेराव : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : क्षुल्लक कारणावरून एका स्कूल व्हॅनचालकास दारुड्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे शनिवारी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. सदर दारुड्या पोलिसावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.
धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील आठवडी बाजार चौकात शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मंगरूळ पोलीस ठाण्यातील मद्यधुंद अवस्थेत कर्मचारी राजेश टेकाम ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून शिवीगाळ करीत होता. याचवेळी गावातीलच स्कूल व्हॅनचालक अनिल विष्णू गोहणे (४५) हा आठवडी बाजार चौकातून घरी जात असताना दारूच्या नशेत धुंद असलेल्या पोलीस कर्मचारी राजेश टेकाम याने अनिलला अडवून प्रथम अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तद्नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. खाली जमिनीवर पडल्यावरसुद्धा पोलीस कर्मचाºयाने त्यांना हाताने धरून तोंडावर थापडा, बुक्क्यांनी मारहाण केली. यात अनिल गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तणावसदृश स्थिती : दंगा नियंत्रण पथकाला पाचारण
सदर पोलीस कर्मचारी राजेश टेकाम हा नेहमी दारू पिऊन ग्रामस्थांना शिवीगाळ करतोय. स्कूल व्हॅनचालक अनिल गोहणे याला गंभीर मारहाण केल्याने सदर पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पोलीस ठाण्याला रविवारी दुपारी १२ वाजता घेराव घातला. येथील ठाणेदार विवेकानंद राऊत यांनी ग्रामस्थांना शांत केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटना स्थळी भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढली. गावातील परिस्थिती पाहता दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.
'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचा नेहमीच त्रास
सदर पोलीस कर्मचारी राजेश टेकाम हा परिसरात वादग्रस्त राहिलेला आहे. काही दिवसांपूर्वी धामणगाव मंगरूळ रोडवरून चालणाऱ्या स्कूल बसेस अडवून पैसे मागण्याच्या तक्रारीसुद्धा सुद्धा आहेत. तसेच दारू पिऊन आॅटोचालकांना व सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिल्याचेसुद्धा समोर आले आहे.

या प्रकरणाची सत्यता पडताळून यात कोण दोषी याची चौकशी करण्यात येईल. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अविनाश शिंगटे,
पोलीस उपविभागीय अधिकारी

Web Title: Vaishlechas suffers from drunken school in Drunk School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.