अनाथाश्रमात साजरा केला ‘व्हॅलेन्टाईन डे’
By admin | Published: February 15, 2017 12:15 AM2017-02-15T00:15:00+5:302017-02-15T00:15:00+5:30
विदर्भ युथ वेलफेअर सोेसायटीद्वारे संचालित येथील टायटन्स पब्लिक स्कूलतर्फे अनाथाश्रमातील मुलांसोबत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यात आला.
टायटन्स पब्लिक स्कूलचा उपक्रम : विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप
बडनेरा : विदर्भ युथ वेलफेअर सोेसायटीद्वारे संचालित येथील टायटन्स पब्लिक स्कूलतर्फे अनाथाश्रमातील मुलांसोबत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव असावी व अभ्यासासोबतच सेवा आणि सेवाभाव विकसित व्हावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाधअयक्ष विनय गोहाड, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य हेमंत देशमुख, नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख, प्राचार्य श्वेता पैठणकर आदींची उपस्थिती होती.
याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी अनाथाश्रमात भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. काही वेळ अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसमवेत घालविण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप तसेच विविध बक्षिसांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी सदाशांती बालगृहाचे अध्यक्ष ए.पी.इंगळे, मुख्याध्यापक पवार, सचिव कुमुदिनी इंगळे, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. या मंडळींनी अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांना कपडे, खाऊ व अन्य वस्तूंचे वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलले होते. त्यांनी शिस्तीत भेटवस्तू स्वीकारून अनाथाश्रमाची शिकवण मान्यवरांच्या नजरेस आणून दिली. (प्रतिनिधी)