‘त्या’ वैधमापन निरीक्षकास अटक
By admin | Published: April 6, 2015 12:23 AM2015-04-06T00:23:40+5:302015-04-06T00:23:40+5:30
शहरासह तालुक्यातील दुकानदारांना वस्तुंवर किमती, उत्पादकांचे नाव नसल्यास दंडाची व कायद्याची धमकी देऊन ...
पोलिसांची कारवाई : व्यापाऱ्यांकडून वसुली
वरूड : शहरासह तालुक्यातील दुकानदारांना वस्तुंवर किमती, उत्पादकांचे नाव नसल्यास दंडाची व कायद्याची धमकी देऊन बक्कळ रक्कमेची वसुली करणाऱ्या वैधमापन निरीक्षक विजय बनाफर यांना गेल्या मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी चोप देऊन वरुड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणाची अकोला विभागाचे उपनियंत्रक ललित हारोडे यांच्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. शनिवारी वरुड पोलिसांनी खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवून या अधिकाऱ्याला अटक केली आहे.
शहरातील दुकानदारांना धमकावून आणि कायदयाची भीती दाखवून लाखो रूपये उकळणाऱ्या या अधिकाऱ्याविरूध्द दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या मनात असलेल्या असंतोषाचा भडका २४ मार्च रोजी उडाला होता.