वानराचा मृत्यू; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:57 PM2019-01-12T22:57:45+5:302019-01-12T22:58:01+5:30
वानरांच्या कळपावर श्वानाने हल्ला चढविल्याने माकडिणीचे पिलू गंभीर जखमी झाले, तर पळत सुटलेले एक माकड विद्युत शॉकने दगावले. ही घटना शनिवारी सकाळी साईनगर स्थित भरतनगरात घडली. निसर्गप्रेमींनी धाव घेऊन जखमी माकडिणीसह पिल्लांना उपचार दिले. या घटनेमुळे भरतनगर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, वनविभागाचे पथक बऱ्याच वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत माकडाला ताब्यात घेतले.
अमरावती : वानरांच्या कळपावर श्वानाने हल्ला चढविल्याने माकडिणीचे पिलू गंभीर जखमी झाले, तर पळत सुटलेले एक माकड विद्युत शॉकने दगावले. ही घटना शनिवारी सकाळी साईनगर स्थित भरतनगरात घडली. निसर्गप्रेमींनी धाव घेऊन जखमी माकडिणीसह पिल्लांना उपचार दिले. या घटनेमुळे भरतनगर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, वनविभागाचे पथक बऱ्याच वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत माकडाला ताब्यात घेतले.
भरतनगरात श्वानाने माकडिणीसह पिलावर हल्ला केल्याची माहिती निसर्गप्रेमी विजय खोटे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी एका माकडाचा खांबावरील विद्युत तारेच्या प्रवाहाने मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले. विजय खोटे यांनी वन्यप्रेमी चेतन भारती, अनुराग बाराहाते, मयूर हरीहर, निलेश कंचनपुरे यांच्या मदतीने जखमी माकडिणीसह पिलाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांना पशुचिकित्सक किनगे यांच्याकडे नेण्यात आले. तेथे दोन्ही वानरांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. श्वानाने चावा घेतल्याच्या जखमेवर तब्बल २० टाके मारण्यात आले. त्यानंतर माकडिणीसह पिलाला पुढील उपचारासाठी कार्सचे राघवेंद्र नांदे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
श्वानाच्या हल्ल्यात दोन माकडे जखमी झाली, तर विद्युत तारेच्या प्रवाहाला चिकटून एकाचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.
- अमोल गावनेर
वनरक्षक, वडाळी