बेभान कार चालकाने चार दुचाकींना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:12 PM2018-08-04T22:12:08+5:302018-08-04T22:13:00+5:30

शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या.

The vanished car driver flew four bikegoers | बेभान कार चालकाने चार दुचाकींना उडविले

बेभान कार चालकाने चार दुचाकींना उडविले

Next
ठळक मुद्देदोन दिवसात दुसरी घटना : अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे वाढले अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या.
या अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाथे चौकात घडलेल्या अपघातात रोशन अळसपुरे (३०,रा.शशिनगर) व निकिता राजकुमार सहारे (२३) हे दोघेच राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचले, तर अन्य जखमी पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी चालक योगेश ज्ञानेश्वर जवंजाळ (रा.रविनगर) याला ताब्यात घेतले. शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्तीत वाहने चालवित असल्यामुळे अपघात वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी फे्रजरपुरा हद्दीतील वडाळी मार्गावर भरधाव ट्रकने चार दुचाकींना एका पाठोपाठ धडक दिली. या अपघातातही पाच जण जखमी झालेत. ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. शुक्रवारी रात्री भरधाव कार क्रमांक एमएच ०३ एडब्ल्यू ०४३२ नवाथे रेल्वे पुलाकडून बडनेराकडे जाण्यासाठी वळत होती. दरम्यान बडनेरा रोडच्या कडेला उभ्या दुचाकींना कारने धडक देत समोर जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक दुचाकी व कार खाली आली होती. सुदैवाने प्राणहानी टळली. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहने थांबली होती. नागरिक व जखमींनी कारचालकाला चोप दिला. त्याने पसार होऊन राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कार ताब्यात घेतली. वाहतूक सुरळीत केली. दोन दिवसांत ही दुसरी घटना शहरात घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांविरुद्ध द्वेषभावना भडकाविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
वडाळी मार्गावर झालेल्या अपघातातील दुचाकी घटनासथळीच पडून होत्या. दरम्यान एका इसमाने जमिनीवर पडलेल्या दुचाकी पोलिसांना उचलू न देता जमावाला भडकविण्याचे प्रयत्न केला. लोकांमध्ये पोलिसांविरुद्ध द्वेषभावना भडकावित, शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात पोलिसांनी संजयसिंह कुवरसिंह ठाकूर (४७,रा.व्यकटेंश कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: The vanished car driver flew four bikegoers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.