जलयुक्त शिवारात वरुड अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:40 PM2017-11-14T23:40:57+5:302017-11-14T23:41:13+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वरुड तालुक्यातील गव्हाणकुंडला विभागीय स्तराचा प्रथम, टेंभूरखेड्याला जिल्ह्यातून प्रथम आणि पिंपळशेंडाला पाचवा पुरस्कार प्राप्त झाला.

Varud tops in water tank | जलयुक्त शिवारात वरुड अव्वल

जलयुक्त शिवारात वरुड अव्वल

Next
ठळक मुद्देविभागात गव्हाणकुंड : टेंभूरखेडा जिल्ह्यात पहिला

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वरुड तालुक्यातील गव्हाणकुंडला विभागीय स्तराचा प्रथम, टेंभूरखेड्याला जिल्ह्यातून प्रथम आणि पिंपळशेंडाला पाचवा पुरस्कार प्राप्त झाला.
अकोला येथे हा पुरस्कार वितरण नुकताच राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पार पडला. कृषिमंत्री पांडुरंंग फुंडकर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गव्हाणकुंड ग्रामपंचायतीला साडेसात लाख रुपयांचा प्रथम, टेंभूरखेडा ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावरील एक लाख रुपयाचा प्रथम, तर पिपंळशेंडाला ५० हजार रुपये पुरस्कार घोषित झाला होता. यावेळी गव्हाणकुंडचे अर्चना मुरुमकर, बाळासाहेब मुरुमकर, प्रदीप मुरुमकर, टेंभूरखेडाच्या सरपंच वंदना पंधरे, अशोक पंडागरे, मनोज माहूलकर, छत्रपती कंठक, मोहन फुले, महेंद्र मेश्राम यांनी पुरस्कार स्वीकारला.
तिन्ही गावांमध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यामुळे भूजल पातळी कायम राखण्यात यश येणार आहे. यामध्ये नाला खोलीकरण, बंधारे, सिमेंट प्लग, शेतातील पाणी अडविण्याकरीता बांधबंदिस्ती यासारख्या कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये लोकसहभाग मिळाल्याने पुरस्कारासाठी पात्र ठरलो, अशी प्रतिक्रिया पुरस्कृत गावांच्या पदाधिकाºयांनी दिली.

Web Title: Varud tops in water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.