तिपटीने किंमत वाढूनही वासनी प्रकल्प अपूर्ण; ४३१७ हेक्टर क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:37 PM2019-05-09T18:37:22+5:302019-05-09T18:38:13+5:30

जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प हा महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अद्ययावत किमतीत तीनपटीने वाढ झाली असतानाही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.

Vashani project is incomplete even after three-dimensional price increases; 4317 hectare capacity | तिपटीने किंमत वाढूनही वासनी प्रकल्प अपूर्ण; ४३१७ हेक्टर क्षमता

तिपटीने किंमत वाढूनही वासनी प्रकल्प अपूर्ण; ४३१७ हेक्टर क्षमता

Next

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प हा महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अद्ययावत किमतीत तीनपटीने वाढ झाली असतानाही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. अद्यापही प्रकल्पाचे ८० टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाची अद्ययावत किंमत ७५१.६७ कोटी झाली असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ४३१७ हेक्टर सिंचनक्षमतेचा असेल. 

पर्यावरणाच्या मान्यतेअभावी गेल्या वर्षभरापासून प्रकल्पांचे काम बंद होेते. मात्र, काही आठवड्यांपूर्वी पर्यावरण विभागाने मान्यता दिल्याने सदर प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकºयांना सिंचनाकरिता पाणी द्यायचे असेल, तर सदर प्रकल्पांची घडभरणी होेणे गरजेचे आहे. वासनी प्रकल्पाला जेव्हा मान्यता मिळाली तेव्हा प्रथम प्रशासकीय मान्यता १९७.८३ कोटींची होती. मात्र, प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. पुनर्वसन, भूसंपादन व पर्यावरण मान्यतेचा खोडा निर्माण झाल्याने वेळ लागल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्याकारणाने प्रकल्पाची किंमत वाढत गेली.

२०१८-१९ मध्ये सदर प्रकल्पांवर ४८ कोटी ६२ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मार्च २०१९ पर्यंत सदर प्रकल्पावर ५५६ कोटी ५७ लाख ४ हजारांचा खर्च झाला आहे. १ एप्रिलपर्यंत १९५.१० कोटी एवढी प्रकल्पाची उर्वरित किंमत होती. वासनी प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्याकारणाने जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 

भूसंपादन पूर्ण झाले असून, तीन गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पर्यावरण मान्यतेत सदर प्रकल्प अडकला होता. आता मान्यता मिळाली आहे. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल.
- रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती

Web Title: Vashani project is incomplete even after three-dimensional price increases; 4317 hectare capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.