वाठोडा शुक्लेश्वर गावात वादळी वाऱ्याने छप्पर उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:45+5:302021-05-31T04:10:45+5:30
तुफान वादळी वाऱ्यामुळे झाडे व विद्युत वहिनी पोलदेखील रस्त्यावर झुकले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारादेखील तुटल्या आहेत. यामध्ये गजानन ...
तुफान वादळी वाऱ्यामुळे झाडे व विद्युत वहिनी पोलदेखील रस्त्यावर झुकले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारादेखील तुटल्या आहेत. यामध्ये गजानन खोपे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अवघ्या १५ मिनिटात वादळी वारा व पावसाचा तडाखा बसल्याने संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर या गावात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, वाऱ्याचा वेग मंदावल्याने परिस्थिती सामान्य झाल्याचे वाटत असतानाच शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढला. बघता बघता त्याचे रूपांतर वादळी वाऱ्यात झाले आणि सोबत पाऊसही कोसळला. अवघ्या १५ मिनिटात वादळी वाऱ्यासह पावसाने वाठोडाकरांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. काही वेळातच हे संकट ओसरले. मात्र रिमझिम पाऊस सुरूच होता. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने परिसरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. झाडांची पडझड, खांबही तुटले. अवघ्या १५ मिनिटांत वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सर्वच लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने भातकुली तहसीलदार नीता लबंडे यांच्या आदेशानुसार तलाठी संजय पवार यांनी तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा केले आहे.
आर्थिक मदत भेटण्यासाठी सर्व तो प्रयत्न करणार असे तलाठी यांनी सांगितले. यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच मायाताई बुरघाटे,पोलीस पाटील विनोद बागडे यांचा सहभाग होता.