वीणा बोबडे सभापती, सोनाली नवले उपसभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:13 AM2021-03-21T04:13:39+5:302021-03-21T04:13:39+5:30

मोर्शी पंचायत समिती, भाजपचे वर्चस्व मोर्शी : स्थानिक पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक शनिवारी पंचायत ...

Veena Bobade Speaker, Sonali Navale Deputy Speaker | वीणा बोबडे सभापती, सोनाली नवले उपसभापती

वीणा बोबडे सभापती, सोनाली नवले उपसभापती

Next

मोर्शी पंचायत समिती, भाजपचे वर्चस्व

मोर्शी : स्थानिक पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक शनिवारी पंचायत समिती सभागृहात तहसीलदारांच्या मार्गदर्शनात पार पडली. यात सभापतीपदी वीणा बोबडे अविरोध, तर उपसभापतीपदी सोनाली नवले यांची निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सभापती पदासाठी भाजपच्या वीणा बोबडे, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे भाऊराव छापाने, सोनाली नवले व यादवराव चोपडे यांनी नामांकन दाखल केले. पैकी यादवराव चोपडे यांनी नामांकन परत घेतले. सभापतीपदासाठी वीणा बोबडे यांचा एकच उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदासाठी सोनाली नवले यांना सात मते प्राप्त झाल्याने त्यांची उपसभापतीपदी वर्णी लागली.

मोर्शी पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. १० सदस्य असलेल्या या पंचायत समितीत माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपाचे ६, शिवसेना २, आणि काँग्रेस व भाकप यांचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या अंतर्गत करारानुसार मावळते सभापती यादवराव चोपडे आणि उपसभापती माया वानखडे यांनी कार्यकाळ संपुष्टात येताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या या जागेचा पदभार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांचेकडे तात्पुरता सोपविण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

------

Web Title: Veena Bobade Speaker, Sonali Navale Deputy Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.