अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे रानभाज्यांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:16 PM2020-07-14T12:16:06+5:302020-07-14T12:19:46+5:30

वरुडमध्ये रानभाज्यांची स्पर्धा घेण्यात येऊन तीत २३ स्पर्धा महिलांचा सहभाग आणि ७ रान भाज्यांचा समावेश करण्यात आला होता.

Vegetable competition at Warud in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे रानभाज्यांची स्पर्धा

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे रानभाज्यांची स्पर्धा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: वरुडमध्ये रानभाज्यांची स्पर्धा घेण्यात येऊन तीत २३ स्पर्धा महिलांचा सहभाग आणि ७ रान भाज्यांचा समावेश करण्यात आला होता.
डॉ . चरण सोनारे यांनी जुनं ते सोनं म्हणून अलीकडेच रानभाज्यांची स्पर्धा घेतली . यामध्ये शहरातील महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणून स्पर्धेत २३ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला होता . ७ विविध प्रकारच्या रान भाज्या सादर करण्यात आल्या होत्या .

पाश्चात संस्कृतीमध्ये वावरत असताना यु ट्यूब व्रुरून विविध व्यंजने आणि भाज्या आपण शिकलो आणि भारतीय संस्कृती विसरलो. परंतु भारतीय भाज्यांचे जातं करण्या करीत रानावनातील भाज्याची चव चाखायला मिळावी म्हणून दुर्लक्षित रानभाज्यांची स्पर्धा श्री विश्वकृपा आयुवेर्दीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र चे वतीने आकरण्यात आले होते . नवीन पिढीपासून या रानभाज्या दुरावत चालल्या आहेत आणि जनारोग्य कमी झालेले आहे.

रानावनात मिळणाऱ्या या रानभाज्या शरीराला पोषक तर आहेतच सोबतच रसायन मुक्तही आहेत. या भाज्या औषधीयुक्त सांगितलेल्या आहेत. या रानभाज्यांचे महत्व वृद्धिंगत व्हावे या हेतूने कोरोनाचे सर्व नियम पाळत, रानभाज्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते . या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला नियमानुसार कमीच स्पर्धक घेण्यात आले. पुढील वर्षी 'रानमहोत्सव' साजरा करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केलेला आहे. रानभाज्या बघण्याकरिता शेकडो लोकांनी हजेरी लावली होती .

Web Title: Vegetable competition at Warud in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.