संचारबंदीत पुन्हा भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:18+5:30

अंमलबजावणीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने नागपुरी गेट चौकात रविवारी सकाळी पुन्हा भाजीबाजार भरला. त्याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नागपुरी गेट ठाण्यातील एकाही कर्मचाºयाने ढुंकूनही पाहिले नाही. महापालिकेचे पथक या भागात फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे त्या भागातील काही नागरिक, पोलीस व महापालिका प्रशासन किती पालन करतात, ही बाब आता उघड झाली आहे.

Vegetable market closed again | संचारबंदीत पुन्हा भाजीबाजार

संचारबंदीत पुन्हा भाजीबाजार

Next
ठळक मुद्देनागपुरी गेट चौकात पायमल्ली : पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पुन्हा संचारबंदीत भाजीपाल्याचा लिलाव झाला. चहा-नाष्ट्याचे ठेल्यांवरून वितरण झाले. गुटखाही विकला गेला. हे घडले स्वातंत्र्यदिनी देशसेवेची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी. या ठिकाणी बाजार भरविला गेल्याचे गतवेळेप्रमाणे ना पोलीस-महापालिका प्रशासनाच्या गावी होते, ना जिल्हा प्रशासनाच्या.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे जिल्ह्यात शनिवार व रविवारी संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. अंमलबजावणीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने नागपुरी गेट चौकात रविवारी सकाळी पुन्हा भाजीबाजार भरला. त्याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नागपुरी गेट ठाण्यातील एकाही कर्मचाºयाने ढुंकूनही पाहिले नाही. महापालिकेचे पथक या भागात फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे त्या भागातील काही नागरिक, पोलीस व महापालिका प्रशासन किती पालन करतात, ही बाब आता उघड झाली आहे.
‘लोकमत’द्वारे संचारबंदी आदेशात नागपुरी गेट चौकात सुरू असलेल्या भाजीबाजाराचे सचित्र वास्तव ३ ऑगस्टला जनदरबारात मांडून प्रशासनाची पोलखोल केली होती. यावर महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी या झोनच्या सहायक आयुक्तांसह बाजार व परवाना तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखांना शो कॉज नोटीस बजावण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले होते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनीदेखील नागपुरीगेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे गत रविवारी या मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला, तर महापालिका पथकांनीही या ठिकाणी पाहणी केली.
विद्यमान आठवड्यात येथे पुन्हा भाजीबाजार भरतो काय, याचे रिअ‍ॅलिटी चेक १६ आॅगस्टला पहाटे ‘लोकमत’द्वारा करण्यात आले असता, पुन्हा याच ठिकाणी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून भाजीबाजार भरला.

संचारबंदीत शिथिलता फक्त १५ ऑगस्टला
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ६० तासांच्या संचारबंदीत स्वातंत्र्यदिन साजरा करता यावा, यासाठी शनिवारी सकाळी ६ ते ११.३० या वेळेत शिथिलता देण्यात आली. या संपूर्ण काळात सर्व भाजीबाजार, बाजार समितीमधील भाजीपाल्याचा लिलाव बंद होता. फक्त नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील भाजीबाजार सुरू राहिला. कायदा, नियमांची पायमल्ली रोखणार की नाही, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.

चहा, गुटखा, नाष्ट्याच्या गाड्याही
या ठिकाणी भाज्यांचा लिलाव झाला. फळे विक्रीला होती. हातगाड्यांवर चहा-नाष्टा विक्री सुरू होती. यावर ताण म्हणजे गुटखाविक्री करतांनादेखील काही जण दिसून आलेत. ही संचारबंदी आदेशाची पायमल्ली पोलीस व महापालिका प्रशासनाला आढळून येऊ नये, याबाबत आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. संचारबंदीत विक्रेते व ग्राहक या ठिकाणी आले कुठून व भाजीबाजार भरला कसा, याला पाठिंबा कुणाचा, अशी विचारणा होत आहे.

Web Title: Vegetable market closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार