चिखलदरा घाटात वाहनांचा जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:08 PM2019-08-04T22:08:22+5:302019-08-04T22:09:09+5:30
येथे हजारो पर्यटकांनी रविवारी गर्दी केल्याने हरिअमराई घाटात वाहने तब्बल दोन तास जाम लागला होता. हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने सदर प्रकार घडला. या पॉइंटवर पर्यटकांची गर्दी होत असताना वनविभागाचा एकही कर्मचारी नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : येथे हजारो पर्यटकांनी रविवारी गर्दी केल्याने हरिअमराई घाटात वाहने तब्बल दोन तास जाम लागला होता. हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने सदर प्रकार घडला. या पॉइंटवर पर्यटकांची गर्दी होत असताना वनविभागाचा एकही कर्मचारी नव्हता.
चिखलदरा पर्यटन स्थळावर शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत आहेत. ते शेकडो वाहनातून येत असल्यामुळे रस्ताने मनमानेल तसी वाहन उभी केल्याचा प्रकार होत आहे.त्यामुळे ठिकठिकाणच्या पार्इंटवर वाहनांचा जाम लागत आहे.
परतवाडा येथून घटांग आणि धामणगाव गढी मार्गाने ठिकठिकाणी उंच पहाडावरून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांतून निघणारे पांढरे शुभ्र दाट धुके, पर्यटकांना भुरळ घालणारे ठरले आहे. परिणामी फोटो काढण्याच्या मोहात सर्व व नियम धाब्यावर बसविले जात आहे. चिखलदरा शहरात पोलिसांनी बाहेरूनच वाहने वळविल्यामुळे या आठवड्यात मात्र वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले.
हरिआमराई पॉइंट रामभरोसे
मडकीनजीकचा हरिआमराई पॉइंट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती. या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला आहे. त्या बंधाºयातून पाणी ओसंडून वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक अगदी रस्त्यावर वाहने लावतात.या प्रकाराला स्थानिक पोलिसांनी देखील आळा घालावा.
कार दरीत, दुचाकीस्वाराला अपघात
पर्यटकांच्या वाहनाला पंचबोल पॉइंट रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने यात सर्व सुखरूप बचावले. रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत ही कार घसरली. काही हुल्लडबाज भरधाव दुचाकी चालवत असल्याचे चित्र होते. येथील वन उद्यानानजीक दारू पिऊन दुचाकी घसरून पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले.
२०० फूट खोल दरीत कार कोसळली
चिखलदऱ्याहून अमरावतीकडे परतणाऱ्या एका कुटुंबाचे चारचाकी वाहन रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास २०० फु ट खोल दरीत कोसळले. मोथा नजिकच्या सेल्फि पॉर्इंटखाली ही घटना घडली. दरम्यान या मार्गाने परतणाऱ्या पर्यटकांनी दोराच्या सहाय्याने त्या वाहनातील पाचही जणांना दरीबाहेर काढले. अमरावतीचे ते कुटूंब जखमी झाले आहे. वाहन दरीबाहेर काढण्यात आले नाही.