आरटीओत ऑनलाइन फाॅर्म भरणाऱ्या वाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:00 AM2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:01:03+5:30

आरटीओचे मुख्य प्रवेशव्दार बंद आहे. लहान प्रवेशव्दारातून एंट्री प्रवेश केला जातो. तेथे शिकाऊ लायसन्स व पर्मनन्ट लायसन्स काढण्याकरिता दलालांचा गराडा नागरिकांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे येथे नियमापेक्षा जास्त पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. आरटीओ परिसरात ३० ते ४० व्हॅनमध्ये ऑनलाईन फार्म भरून देणे, नवीन लायसन्सच्या अपार्टमेंट घेणे किंवा इतर फाॅर्म भरून देण्याचा व्यवसाय चालतो. त्यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहन ठेण्याससुद्धा जागा नसते. 

Vehicles filling up online forms at RTO | आरटीओत ऑनलाइन फाॅर्म भरणाऱ्या वाहनांचा ठिय्या

आरटीओत ऑनलाइन फाॅर्म भरणाऱ्या वाहनांचा ठिय्या

googlenewsNext

संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरटीओच्या परिसरात ४५० पेक्षा जास्त एजंटकम दलालांचा सुळसुळाट असतो. यासंदर्भाचा प्रश्न ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडला. मात्र, तरीही आरटीओ परिसरात व्हॅनमध्ये ऑनलाईन फाॅर्म भरून देणाऱ्यांचा व्यवसाय फोफावला आहे. त्यांनी थेट आरटीओ परिसरातच दुकाने थाटली आहेत. या व्यावसायिकांना अभय कुणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरटीओचे मुख्य प्रवेशव्दार बंद आहे. लहान प्रवेशव्दारातून एंट्री प्रवेश केला जातो. तेथे शिकाऊ लायसन्स व पर्मनन्ट लायसन्स काढण्याकरिता दलालांचा गराडा नागरिकांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे येथे नियमापेक्षा जास्त पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. आरटीओ परिसरात ३० ते ४० व्हॅनमध्ये ऑनलाईन फार्म भरून देणे, नवीन लायसन्सच्या अपार्टमेंट घेणे किंवा इतर फाॅर्म भरून देण्याचा व्यवसाय चालतो. त्यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहन ठेण्याससुद्धा जागा नसते. 
विशेषत: ज्या ठिकाणी लर्निंग लायसन्स काढले जाते, अधिकाऱ्यांची वाहने उभी केली जाते, त्या ठिकाणापर्यंत एजंटांची नियमबाह्य वाहने उभी केली जातात. 
आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

आरटीओच्या बाहेरही वाहने
आरटीओच्या आतील परिसरातील जागा ऑनलाइन फाॅर्म भरून देणाऱ्या वाहनचालकांनी व्यापली आहे. मात्र आरटीओच्या बाहेरही जिजाऊ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटला आहे. याकडे अतिक्रमण विभागाचे व वाहतूक पोलिसांचे दुुुर्लक्ष आहे. वाहने दोन्ही बाजूला लावल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचण निर्माण होते. येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बाहेरील वाहने ठेवून व्यवसाय करणे नियमबाह्य आहे. वाहने हटविण्याच्या सूचना यापूर्वीच संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना दिल्या आहेत. त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
- रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

Web Title: Vehicles filling up online forms at RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.