आरटीओच्या परिसरातील वाहने काढली, रस्त्यावरील वाहनांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:55+5:302021-09-06T04:16:55+5:30
(फोटो आहे. ) अमरावती : आरटीओत नेहमीच दलाल कम एजंटाचा सुळसुळाट असतो तसेच या ठिकाणी ऑनलाईन फाॅर्म करून देणारी ...
(फोटो आहे. )
अमरावती : आरटीओत नेहमीच दलाल कम एजंटाचा सुळसुळाट असतो तसेच या ठिकाणी ऑनलाईन फाॅर्म करून देणारी ऑनलाईन ओमनी व्हॅन लावून आरटीओतील आतील परिसराची जागा व्यापली होती. ती वाहने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करून आरटीओ बाहेर काढली. मात्र, आता ही वाहने आरटीओच्या समोरील मार्गावर लावून व्यवसाय करून रस्त्यावर अतिक्रमण केली जात आहे. आरटीओच्या परिसरातील वाहने काढली, बाहेरील वाहनांचे काय, असा प्रश्न पुन्हा या मार्गावरून ये- जा करणारे नागरिकांना पडला आहे.
आरटीओत नेहमीच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते तसेच आरटीओकडून विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा गणेडीवाले ले-आऊटकडे जाण्यासाठी हा शाॅर्ट कट मार्ग असल्याने या मार्गावरून प्रचंड वाहतूक असते. मात्र, आरटीओपुढील मार्गावर ऑनलाइन फार्म भरून देणारी वाहने, पीओसी काढून देणारी वाहने तसेच काही व्यवसायिकांनी आपला व्यवसाय थाटला आहे. मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण करून हे व्यावसायिक व्यवसाय करतात. त्यामुळे इतर वाहतुकीला तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागतात. परिणामी अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, याकडे शहर वाहतूक विभागाचे तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या नियमबाह्य वाहनांना हटवावे, अशी मागणी होत आहे.
कोट
रस्त्यावर वाहने ठेवली जात असतील, तर कारवाई करण्यात येईल. तशी आमची नेहमीच कारवाई सुरू असतेच. मात्र, रस्त्यावरील वाहने हटविली जातील.
- बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग