जमावबंदी शहरात वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:01:19+5:30

सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी होते. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसून आले.

Vehicles swarm in the city | जमावबंदी शहरात वाहने सुसाट

जमावबंदी शहरात वाहने सुसाट

Next
ठळक मुद्देवाहनचालकांना तंबी : जिल्ह्याच्या सीमेवर, महत्त्वाच्या चौकात वाहनांची कसून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता, रविवारी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळला गेला. मात्र, सोमवारपासून जमावबंदी कायदा लागू करण्यात आला असतानाही नागरिक जमावाने एकत्र आले, तर काहींनी वाहनाने शहरात अनावश्यक फेरफटका मारला. पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये अशा वाहनांची तपासणी केली. याशिवाय जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करून ती पुढे सोडण्यात आली. नागरिकांनी जमावबंदी कायदा गुंडाळल्याचेच दिसून आले.
सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी होते. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसून आले. जमावबंदी लागू झाली असताना आणि पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनात येत असतानाही पोलिसांनी सौम्य भूमिका घेतल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, राजकमल चौकात दुपारी १२ वाजतानंतर पोलिसांनी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून कोठे, कशाला जाताहेत, याबाबत चौकशी केली. मात्र, कलम १४४ अन्वये जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणाºयाविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन शहरभर करण्यात आल्याचे वास्तव आहे. नागरिक खासगी वाहनांनी मोकळ्या रस्त्यांची मौज लुटण्यासाठी फिरत असल्याचे चित्र होते.


जमावबंदी कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील. आयुक्तालयांतर्गत सर्वच ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.
- संजीवकुमार बावीस्कर, पोलीस आयुक्त,अमरावती

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले. सोमवारपासून पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत, असा हा जमावबंदी कायदा आहे. यात औषध दुकाने, किराणा, दूध, फळे व भाजीपाला या दैनंदिन गरजेच्या वस्तू वगळता, अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

सीमेवर वाहनांची तपासणी
जिल्ह्याच्या सीमेवरून प्रवेश अथवा जिल्ह्याबाहेर जाणाºया वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान सन्नाटा होता. मात्र, सोमवारपासून लागू झालेल्या जमावबंदी कायद्याचे गांभीर्य नागरिकांनी लक्षातच घेतले नाही. सीमेवरून जाणाऱ्या वाहनांमध्ये सहा ते सात प्रवाशांनी प्रवास केला. यात युवक आघाडीवर असल्याचे दिसून आले.

Web Title: Vehicles swarm in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.