अमरावतीत गस्ती पथकाच्या कारवाईला विक्रेत्यांचा विरोध; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:51 IST2020-04-30T18:50:55+5:302020-04-30T18:51:23+5:30
कोरोना व लॉकडाऊनच्या परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात भाजीबाजारास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही भाजीच्या गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या गस्ती पथकावरच घोषणाबाजी करण्याचा प्रकार येथे गुरुवारी घडला.

अमरावतीत गस्ती पथकाच्या कारवाईला विक्रेत्यांचा विरोध; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कोरोना व लॉकडाऊनच्या परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात भाजीबाजारास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही भाजीच्या गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या गस्ती पथकावरच घोषणाबाजी करण्याचा प्रकार येथे गुरुवारी घडला.
बडनेरा येथील कुरेशीनगर भागात लावलेल्या गाड्या हटविण्यासाठी गस्ती पथक आले व त्याने या गाड्या जप्त करून नेण्याची कारवाई सुरू केली. त्याविरोधात तेथील विक्रेत्यांनी जोरदार विरोध करणे सुरू केले. त्यांनी पथकातील सदस्यांशी हुज्जत घातली व जप्त केलेले साहित्य वाहनातून काढण्याचा प्रयत्नही केला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळे आणल्याबद्दल तिघांविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.