आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्तावाची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:19+5:302021-09-16T04:17:19+5:30

अमरावती : जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता प्राप्त पुस्तकांच्या पडताळणीची प्रक्रिया शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता गर्ल्स ...

Verification of Ideal Teacher Award Proposal | आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्तावाची पडताळणी

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्तावाची पडताळणी

Next

अमरावती : जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता प्राप्त पुस्तकांच्या पडताळणीची प्रक्रिया शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता गर्ल्स हायस्कूल येथे या प्रस्तावाची पडताळणी केली जाणार आहे.

१४ तालुक्यातून प्राथमिकचे १४ तर माध्यमिक विभागातून एका शिक्षकांची आदर्श पुरस्कारासाठी निवड केली जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागविले होते.या प्राप्त प्रस्तावाची १७ सप्टेंबर रोजी केली जाणार यामध्ये पहिल्या टप्यात धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, वरुड, मोर्शी, अचलपूर तसेच दर्यापूर या तालुक्यातील प्रस्ताव सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत पडताळणी केली जाणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत धामणगाव रेल्वे, तिवसा, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, भातकुली, अमरावती या तालुक्यातील प्राप्त प्रस्तावांची पडताळणी समिती मार्फत तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी एजाज खान यांनी नुकतेच परिपत्रक जाहीर केले आहेत.

बॉक्स

पंचायत समितीनिहाय प्राप्त प्रस्ताव

अंजनगाव सुजी ९, अमरावती ७, अचलपूर ५,चांदूरबाजार २, चिखलदारा ६, तिवसा २, दर्यापूर ३, धामणगाव रेल्वे २, धारणी ४, नांदगाव खंडेश्वर ४,मोशी ३, भातकुली २,वरूड ३ या प्रमाणे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

Web Title: Verification of Ideal Teacher Award Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.