दुचाकीची उभ्या दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:10 AM2021-07-18T04:10:42+5:302021-07-18T04:10:42+5:30

अमरावती : भरधाव दुचाकीने रॉग साईडने महिलेच्या उभ्या मोपेडला धडक दिल्याची घटना शुक्रवारी गाडगेनगर हद्दीतील शेगाव ते रहाटगाव रोडवर ...

The vertical of the bike hits the bike | दुचाकीची उभ्या दुचाकीला धडक

दुचाकीची उभ्या दुचाकीला धडक

Next

अमरावती : भरधाव दुचाकीने रॉग साईडने महिलेच्या उभ्या मोपेडला धडक दिल्याची घटना शुक्रवारी गाडगेनगर हद्दीतील शेगाव ते रहाटगाव रोडवर घडली. महिला नवोदय विद्यालय येथून नवसारी ते शेगावकडे मार्गाने जात होती. दरम्यान त्या रस्त्यात थांबल्या, त्यावेळी एमएच २७ एझेड ७५२१ या क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने राँग साईडने महिलेच्या दुचाकीला धडक दिली. यात महिला जखमी झाली. वाहनाचेही नुकसान झाले. महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा नोंदविला.

---------------------------------------

वाहतुकीस अडथळा केल्याने चौघांवर गुन्हा

अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर हातगाडी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने पोलिसांनी चार जणांविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला. नागपुरी गेट पोलिसांना मोहम्मद रफीक मोहम्मद इब्राहिम (५२ रा. कमेला ग्राऊन्ड) व शाहदत खान मोहम्मद खान (५१ रा. अलीमनगर) हे दोघेही पठाण चौकात हातगाडी लावून वाहतुकीस अडथळा करीत दिसले. तर बियाणी चौकात जुनेद मिजाजउद्दीन नसिरोद्दीन शेख (२१ रा. कारंजा, जि. वाशिम, ह.मु.चिलमछावणी) व रविकुमार गुलाब दाभाडे (२१ रा. वृंदावन कॉलनी) यांनी हातगाडी लावून वाहतुकीस अडथळा केल्याचे आढळून आले.

--------------------------------------------

निंभोरा येथील अवैध दारु अड्ड्यावर धाड

अमरावती : बडनेरा पोलिसांनी जुनीवस्तीतील निंभोरा येथे धाड टाकून दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली. अमोल बापुराव रामटेके (४७) व राहुल विष्णू इंगळे (३३ दोन्ही रा. निंभोरा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अमोलच्या ताब्यातून ६६० रुपयांच्या देशी दारुच्या बॉटल्स जप्त केल्या, तर राहुल इंगळेकडून पाचशे रुपयांची गावठी दारु जप्त केली.

Web Title: The vertical of the bike hits the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.