अन् कुलगुरू खेडकर भरून पावले....!

By admin | Published: January 23, 2016 12:38 AM2016-01-23T00:38:19+5:302016-01-23T00:38:19+5:30

आरंभीचे वर्ष वगळता उर्वरित साडेतीन-चार वर्षांच्या कार्यकाळात प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या कुलगुरुंची अवस्था आता गद्गद् झाली आहे.

The Vice Chancellor fills the steps ....! | अन् कुलगुरू खेडकर भरून पावले....!

अन् कुलगुरू खेडकर भरून पावले....!

Next

सन्मानजनक उपलब्धी : वादग्रस्त कारकिर्दीवर ‘नॅक’च्या ‘अ’ मानांकनाचे पांघरूण
प्रदीप भाकरे अमरावती
आरंभीचे वर्ष वगळता उर्वरित साडेतीन-चार वर्षांच्या कार्यकाळात प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या कुलगुरुंची अवस्था आता गद्गद् झाली आहे. नॅक ‘अ’ मानांकन मिळाल्यानंतर त्यांची देहबोली ‘भरून पावल्याची’ प्रचिती देत होती. नॅक ‘अ’ श्रेणी मिळवून देणारे कुलगुरु म्हणून किमान विद्यापीठाच्या इतिहासात तरी मोहन खेडकरांची नोंद होणार आहे.
आपल्या कार्यालयात कुलगुरु शुभेच्छा स्वीकारत असताना प्र-कुलगुरू कार्यालयातील एक प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. नॅकच्या ‘अ’ श्रेणीने ‘सारे काही धुवून निघाले’ अशी ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अन्य सर्व कुलगुरूंच्या तुलनेत मोहन खेडकर यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. हे सत्य कुणीही नाकारणार नाही.
‘कुलगुरु गो बॅक’ अशा घोषणा सुद्धा खेडकरांना ऐकाव्या लागल्यात. एका युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांने तर कुलगुरुंच्या खुर्चीला कार्यालयाबाहेर काढत काळे फासले होते.
२४ फेब्रुवारी २०११ ला मोहन खेडकर कुलगुरुच्या खुर्चीत बसले आणि एकापाठोपाठ एकेक प्रकरण निघत गेली. मुलीचे गुणवाढ प्रकरण असो की, स्वत:चा बांधाबांध भत्ता असो, चांगल्यापेक्षा वादानेच ते अधिक चर्चेत राहिले. गेल्या चार-साडेचार वर्षात विद्यापीठात झालेले सत्कार्य आणि विद्यार्थीभिमुख सुधारणा या काळात झाकोळल्या गेले. सक्तीच्या रजेवर गेलेले पहिलेच
कन्या मृणालचे कथित गुणवाढ प्रकरण, बांधाबांध भत्ता, कुलसचिवांचे १३,३६० प्रकरण, कथित मिशनरीसोबत झालेला एमओयू या व अशा अन्य प्रकरणांचा ठपका खेडकरांवर ठेवण्यात आला. एका युवक संघटनेने त्यांच्या शासकीय निवासस्थानात जाऊन धडक दिल्याने कुलगुरुंच्या महत्तम पदाचा पुरता उपमर्द झाला. त्या पार्श्वभूमीवर खेडकरांना तब्बल ६ महिने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. अमरावती विद्यापीठाच्याच नव्हे तर राज्यातील सर्वच विद्यापीठात सक्तीचे रजेवर पाठविण्यात आलेले ते एकमेवाद्वितीय ठरले. खेडकरांच्या कार्यकाळात विद्यापीठ आणि पर्यायाने कुलगुरुपदाची प्रचंड हेळसांड झाली. (प्रतिनिधी)

‘डाग’ पुसून काढण्यासाठी धडपड
व्हीएनआयटी या जगप्रसिद्ध शिक्षण संस्थेतून कुलगुरू म्हणून अमरावती विद्यापीठात आलेल्या खेडकरांचा तसा या सर्व प्रकरणांशी थेट संबंध नव्हता (अपवाद फक्त कन्या मृणालचे गुणवाढ प्रकरण व बांधाबांध) नव्हता. मात्र कुलगुरु म्हणून प्रत्येक आंदोलनाला त्यांना सामोरे जावे लागले. आंदोलनाइतकाच पोलिसांचा ससेमिराही खेडकरांनी अनुभवला. त्यांना पदावर असताना पोलीस आयुक्तालयाची पायरीसुद्धा चढावी लागली. हा डाग पुसून काढण्यासाठी मग ते सरसावले व त्यांनी विद्यापीठाला ‘बेस्ट स्कोअर’सह ए ग्रेड मिळवून देण्याचा चंग बांधला आणि त्यात ते यशस्वी झाले.

प्रभावी सादरीकरण
२१ ते २४ डिसेंबरदरम्यान नॅकच्या ९ सदस्यीय टिमसमोर कुलगुरू मोहन खेडकरांनी विद्यापीठातील विद्यार्थीभिमुख यंत्रणेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन केले. पाच वर्षांपासून त्रुट्या दूर करण्यावर भर दिला. ‘अ’ श्रेणी मिळवून द्यायचीच, असा दृढ विश्वास घेऊन खेडकर कामाला लागल्याने प्रशासकीय वर्तुळात जिवंतपणा आले. खेडकरांच्या काळात विद्यापीठाला नॅक श्रेणी अ मिळाली हे किमानपक्षी बोलले जाईल, हे लक्षात घेऊन खेडकर अ‍ॅन्ड टिम कामाला लागली आणि फलित म्हणून ३.०७ या तिसऱ्या क्रमांकाच्या उच्च स्कोअर मिळत विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी मिळाली. तसे पत्र येताच खेडकर गद्गद् झाले. सारे संकट दूर झाल्याची ती पावती होती.

Web Title: The Vice Chancellor fills the steps ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.