रस्ता रुंदीकरणात महाकाय वृक्षाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:07 PM2017-09-13T23:07:56+5:302017-09-13T23:08:19+5:30
रस्त्याचा विकास हाच खरा विकास असल्याचे भासवून रुंदीकरणात अडसर ठरत असलेली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : रस्त्याचा विकास हाच खरा विकास असल्याचे भासवून रुंदीकरणात अडसर ठरत असलेली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र वरूड ते पांढुर्णा व नागपूर महामार्गवर पहावयास मिळत आहे. या मार्गावरील ५० ते १०० वर्षांची महाकाय वृक्षांचे बळी जात असल्याने रस्ते ओस पडू लागले आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने लोकसहभाग व शासकीय कर्मचारी, अधिकाºयांकडून वृक्षलागवडीचे लक्ष ठेवून धडाक्यात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र रस्त्याचे चौपदरीकरण होेत असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार नांदगाव पेठ ते पांढुर्णा सीमेपर्यंत चौपदरी रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार कंपनीने काम सुरू केले. प्रत्यक्षात यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण असल्याचे सांगून सिमेंटीकरण करीत आहे. या कामात अडसर ठरणारी शेकडो वर्षे जुनी वड, पिंपळ, आंबा, निंबासह आडजातीचे वृक्ष आहे. पंरतु रस्ता रुंदीकरणात त्यांची कत्तल होत आहे. रस्त्याच्या किंवा कोणत्याही विकासाच्या कामात आडकाठी ठरणाºया महाकाय वृक्षांना जीवनदान देण्याकरिता शासनाने वृक्षारोपणची योजना आखावी, अशी मागणी प्रवीण चौधरी यांनी केली आहे.