बेशिस्त वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

By admin | Published: January 14, 2015 10:58 PM2015-01-14T22:58:45+5:302015-01-14T22:58:45+5:30

स्थानिक पंचवटी चौकात आॅटोरिक्षाखाली चिरडून अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. किमया राजू मानकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती होलीक्रॉस मराठी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी होती.

A victim of untimely transport took the victim of a sparrow | बेशिस्त वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

बेशिस्त वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

Next

अमरावती : स्थानिक पंचवटी चौकात आॅटोरिक्षाखाली चिरडून अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. किमया राजू मानकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती होलीक्रॉस मराठी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी होती. शहरातील बेशिस्त वाहतुकीनेच चिमुकल्या किमयाचा बळी घेतला अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी व्यक्त करीत आहेत. ही घटना बुधवारी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
नेहमीप्रमाणेच बुधवारची सकाळ उगवली. शाळेत जाण्यासाठी तिची लगबगही नेहमीचीच. कडाक्याच्या थंडीतही शाळेच्या ओढीने पहाटे सातच्या आसपास ती घरातून निघाली. आईनेही तिला नेहमीप्रमाणेच निरोप दिला. पण, तिचा हसरा, टवटवीत चेहरा पुन्हा कधीच बघायला मिळणार नाही, याची पुसटशी कल्पनाही त्या माऊलीला नव्हती.
ट्रकचालकाची माणुसकी
घरातून उत्साहात बाहेर पडलेल्या किमयाला घरापासून हाकेच्या अंतरावर दबा धरून बसलेल्या मृत्यूने गाठले.
पोलीस सूत्रानुसार, गाडगेनगर परिसरातील इंगोले प्लॉट येथील रहिवासी किमया मानकर ही होलीक्रॉस हायस्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिकत होती. बुधवारी सकाळी ७.१५ वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी सायकलने निघाली. पंचवटी चौकातील वळणावरुन शाळेच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातील भरधाव अज्ञात आॅटोरिक्षाने किमयाच्या सायकलला जबर धडक दिली. किमया सायकलसह फरफटत जाऊन नजीकच्या दुभाजकावर आदळली. आॅटोरिक्षा तिच्या अंगावरुन निघून गेली. या भयंकर अपघातात किमयाच्या शरीराच्या खालच्या भागाच्या चिंधड्या झाल्या. अपघातानंतर आॅटोरिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
मात्र, ट्रक चालकाने रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या किमयाला पाणी पाजले. घटनेची माहिती तत्काळ गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी किमयाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारदरम्यान ७.४५ वाजता किमयाचा मृत्यू झाला.
क्षणात थांबली ‘किमया’ची किलबिल
घराचे चैतन्य असलेली किमया अतिशय समंजस होती. लहानग्या वयात ती प्रचंड काटकसरी होती. अभ्यासू किमयाचा असा दुर्देवी अंत झालाय यावर तिच्या आई-वडिलांचा विश्वासच बसेना. पंधरा मिनिटांपूर्वी घरातून हसत-खेळत शाळेकडे गेलेल्या किमयाला दिलेला निरोप शेवटचा असेल याची कल्पनाही तिच्या आईला नव्हती. त्यामुळेच किमयाच्या मृत्यूचा आघात तिची आई अर्चनाला सोसवत नव्हता.
तिचा आक्रोश बघणाऱ्यांच्या काळजाला पिळ पाडत होता. तर किमयाची लहानगी ११ महिन्यांची बहिण केतकी निरागस परंतु गोंधळलेल्या डोळ्यांनी आई-वडिलांचा आक्रोश बघत होती. किमयाचे वडील राजू मानकर तर अपघातानंतर नि:शब्द झाले होते.

Web Title: A victim of untimely transport took the victim of a sparrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.