विदर्भात १४ पाणलोट प्रकल्प
By admin | Published: June 9, 2014 01:12 AM2014-06-09T01:12:58+5:302014-06-09T01:12:58+5:30
राज्यातील ९९ मेगा पाणलोट प्रकल्पांपैकी ६८ पाणलोटांचे २६0 प्रकल्प तयार केले होते. त्यापैकी ३२ प्रकल्पांना नाबार्डने मान्यता दिली. या प्रकल्पांची किंमत १७१ कोटी ३१ लाख रुपये इतकी आहे. पणन
जितेंद्र दखने - अमरावती
राज्यातील ९९ मेगा पाणलोट प्रकल्पांपैकी ६८ पाणलोटांचे २६0 प्रकल्प तयार केले होते. त्यापैकी ३२ प्रकल्पांना नाबार्डने मान्यता दिली. या प्रकल्पांची किंमत १७१ कोटी ३१ लाख रुपये इतकी आहे. पणन केंद्राकडून मिळणार्या निधीच्या भरवशावर राज्य सरकारने नाबार्ड अर्थसहाय्यातून १४ मेगा पाणलोट प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेसह इतरांनी हजार ५0५ मेगा पाणलोट घोषित केले आहे. त्यातील प्राथमिकतेनुसार प्रत्येक जिल्ह्यातून चार असे १३२ मेगा पाणलोट नाबार्डमार्फत उपलब्ध होणार्या निधीतून विकसित करण्याचे धोरण राज्य सरकारने २00९ मध्ये स्वीकारले होते. पुढील वर्षी ६८ मेगा पाणलोट विकसित करण्यासाठी निवडण्यात आले. नाबार्डकडून प्रतिमाह कर्जरुपाने मिळणार्या निधीतून विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय २0१0मध्ये डार्क झोनमधील ३१ मेगा पाणलोट विकासासाठी निवडण्यात आले. एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ४९ मेगा पाणलोट आणि नाबार्ड अर्थसाहाय्यातून १४ मेगा पाणलोट विकसित केले जाणार आहेत. मेगा पाणलोट विभागातील तालुकानिहाय अमरावती विभागात १७ तर नागपूर विभागातील १५ पाणलोट प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.