पूर्व विदर्भ, मराठवाड्यावर जलसंकट, व-हाडात ३८ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 04:53 PM2019-01-14T16:53:17+5:302019-01-14T16:53:49+5:30

धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पूर्व विदर्भ व मराठवाडा विभागाावर जलसंकट घोंगावते आहे.

Vidarbha, Marathwada Water Concentration, 38% Water Resource | पूर्व विदर्भ, मराठवाड्यावर जलसंकट, व-हाडात ३८ टक्के जलसाठा

पूर्व विदर्भ, मराठवाड्यावर जलसंकट, व-हाडात ३८ टक्के जलसाठा

Next

- प्रदीप भाकरे
अमरावती : धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पूर्व विदर्भ व मराठवाडा विभागाावर जलसंकट घोंगावते आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये केवळ २३.५२, तर औरंगाबाद विभागातील ९६४ धरणांमध्ये १४.८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यांच्या किंचित पुढे असलेल्या अमरावती विभागातील जलसाठ्याची टक्केवारी (३८.९६) फारशी सुखावह नाही. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जानेवारीतच राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकीनुसार, राज्यातील एकूण ३२६७ धरणांमध्ये १४ जानेवारी अखेरीस केवळ ४२.६९ टक्केच उपयुक्त जलसंचय आहे. गतवर्षीच्या १४ जानेवारी रोजी ती टक्केवारी ६०.५ टक्के अशी होती. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसंकट अधिक तीव्र होण्याची दुश्चिन्हे आहेत. अमरावती विभागातील ४४६ जलप्रकल्पांमध्ये ३८.९६ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ १४.८ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६६.४९ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २३.५२ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ४२ टक्के व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५७.८३ अशा एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये एकूण ४२.६९ टक्की उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
-------------
लघू प्रकल्प कोरडे
राज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६.१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हीच टक्केवारी ६५.३४ अशी होती. एकूण २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.१७ टक्के (गतवर्षी ५५.९२ टक्के), तर २८६८ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २८.४७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच लघु प्रकल्पांमध्ये ४२.३३ टक्के जलसंचय होता.
--------
४२४७ गाव-वाड्यांत टँकरवारी
राज्यातील १३०८ गावे व २९३९ वाड्यांमध्ये एकूण १५६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही सांख्यिकी ७ जानेवारीची असून, १४ जानेवारीपर्यंत त्यात आणखी वाढ होणार आहे. गतवर्षी केवळ १८७ गावांना १५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. टँकरची स्थिती पाहता, गतवर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल दहापट वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील उपयुक्त जलसाठा २३ टक्क््यांच्या आसपास असताना येथे अद्यापही टँकर पोहोचलेले नाहीत.

Web Title: Vidarbha, Marathwada Water Concentration, 38% Water Resource

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी