स्वच्छता अ‍ॅपमध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल! नाशिक पहिल्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 06:17 PM2017-12-29T18:17:14+5:302017-12-29T18:17:30+5:30

स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

Vidarbha's four cities top in cleanliness app! Nashik tops the list | स्वच्छता अ‍ॅपमध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल! नाशिक पहिल्या क्रमांकावर

स्वच्छता अ‍ॅपमध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल! नाशिक पहिल्या क्रमांकावर

Next

- प्रदीप भाकरे

अमरावती : स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणा-या पहिल्या २० शहरांमध्ये विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, अचलपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत प्रत्येक शहराला एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते. ‘एमओएचयूए’ हा अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर नागरिकांनी स्वच्छताविषयक तक्रारी नोंदवाव्यात,  संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याची त्वरित दखल घ्यावी आणि शहर स्वच्छ ठेवावे, अशी त्यामागील भूमिका होती. जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये होवू घातलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात त्यासाठी ४०० गुण ठेवण्यात आलेत.
दोन टक्के नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यास १५० गुण, तक्रारींचा निपटारासाठी १५० गुण व राज्याच्या तुलनेत त्या शहराची रँकिंग किती, यासाठी १०० गुण ठेवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली. तत्पूर्वी, राज्यातील ४३ शहरांपैकी २० शहरांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडिंगचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. नाशिक शहराने ४६,९०६ अ‍ॅप डाऊनलोड करून उद्दिष्टाच्या तुलनेत ३.१६ टक्के आघाडी घेतल्याने या शहराने स्वच्छता अ‍ॅपमध्ये पहिले रँकिंग मिळविले आहे. या २० आघाडीच्या शहरांमध्ये दुसºया क्रमांकावर चंद्रपूर, १० व्या क्रमांकावर अचलपूर, १४ व्या क्रमांकावर अमरावती, १९ व्या क्रमांकावर वर्धा शहर आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या शहरांना त्यांच्या मानांकनात सुधारणा करण्याची संधी आहे.


उद्दिष्ट पूर्ण करणारी २० शहरे
नाशिक, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, वसई, नवी मुंबई, मिरा भार्इंदर, सातारा, बदलापूर, अचलपूर, परभणी, मालेगाव, सोलापूर, अमरावती, अंबरनाथ, जळगाव, उदगीर, सांगली-मिरज-कुपवाड, वर्धा, बार्शी.

Web Title: Vidarbha's four cities top in cleanliness app! Nashik tops the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.