विद्याभारती महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅक ‘अ’ श्रेणी मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:23+5:302021-09-12T04:16:23+5:30
अमरावती : येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळाद्धारा संचालित कॅम्प स्थित विद्याभारती महाविद्यालयाने तिसऱ्यांदा नॅक ‘अ’ श्रेणी मानांकन पटकावला आहे. ३ ...
अमरावती : येथील विद्याभारती शैक्षणिक मंडळाद्धारा संचालित कॅम्प स्थित विद्याभारती महाविद्यालयाने तिसऱ्यांदा नॅक ‘अ’ श्रेणी मानांकन पटकावला आहे. ३ व ४ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील त्रिसदस्यीय चमूने महाविद्यालयाचे मू्ल्यांकन केले असून, ऑनलाईन अहवाल देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्याभारती महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कुलगुरू संजीवकुमार शर्मा (बिहार), सविता दीक्षित (भोपाल), प्राचार्य सतिंदर सिंह (जम्मू) या त्रिसदस्यीय नॅक चमूने दोन दिवस विद्याभारती महाविद्यालयांचे सूक्ष्म अध्ययनाअंती मू्ल्यांकन केले. विद्याभारती महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण आणि गुणवत्तावर्धित असल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल या चमूने बंगळुरू येथे सादर केला. ऑनलाईन सादरीकरणानंतर महाविद्यालयात गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या आधारे नॅकचे तिसऱ्यांदा ‘अ’ श्रेणी मिळविणारे विद्यापीठ अंतर्गत हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. तसेच विद्यापीठाने विद्याभारतीला अग्रणी महाविद्यालय अगोदर घोषित केेले आहे. यूजीसीच्या परामर्श अंतर्गत ‘मेंटर’ अर्थात मार्गदर्शक महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त केला आहे. महाविद्यालय पुढील वर्षात सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल करीत असताना सलग तिसऱ्यांदा नॅकची ‘अ’ श्रेणी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. यूजीसी आणि नॅक समितीला अभिप्रेत संशोधन केंद्र, पीएचडी गाईड, संशोधन पत्रिकांमध्ये अग्रेसर ठरले आहे. तज्ञ्ज प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त ईमारती, अद्यावत तंत्रज्ञानावर आधारीत क्लासरूम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, सांड पाण्यावर आधारित प्रकल्प, भव्य क्रीडांगण आदी नॅक ‘अ‘ श्रेणीसाठी पूरक ठरल्याची माहिती शनिवारी पत्रपरिषदेतून संस्थेचे सचिव डॉ. अशोक चौहान, प्राचार्य प्रज्ञा येनकर, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. आर.एम. पाटील, डॉ. मिथिलेश राठोर, प्रा. मनिंदरसिंग मोंगा यांनी दिली.