कीटकनाशकांची हाताळणी करताना दक्षता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:10 PM2018-08-05T22:10:10+5:302018-08-05T22:11:08+5:30

कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची विषबाधेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे कृषी विभागाद्वारा जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची हाताळणी, साठवण व खरेदी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयी शेतकऱ्यांना अलर्ट करण्यात येत आहे.

Vigilance is important in handling pesticides | कीटकनाशकांची हाताळणी करताना दक्षता महत्त्वाची

कीटकनाशकांची हाताळणी करताना दक्षता महत्त्वाची

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी आयुक्तांचे आवाहन : खरेदी, साठवण, हाताळणीदेखील जरा जपूनच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची विषबाधेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे कृषी विभागाद्वारा जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची हाताळणी, साठवण व खरेदी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयी शेतकऱ्यांना अलर्ट करण्यात येत आहे.
कीटकनाशके खरेदी परवानाधारक विक्रेत्याकडूनच करावी. पूर्ण हंगामाकरिता कीटकनाशक मोठ्या प्रमाणात खरेदी करू नये. खरेदीपूर्वी पॅकिंगवरील लेबल पहावे. अपूर्ण लेबल, घटक पदार्थ नमूद न केलेले पॅकींगवर लेबल नसलेले किटकनाशके खरेदी करू नये. खरेदीपूर्वी कीटकनाशकांचे बॅच नंबर केंद्रीय कीटकनाशक नोंदणी मंडळाचे नोंदणी क्रमांक, उत्पादन तारीख व अंतिम तारीख बघून खरेदी करावेत. वापराची अंतिम तारीख संपलेली अथवा नजीकच्या अंतिम तारखेची कीटकनाशके खरेदी करू नये. कीटकनाशके पॅकींग करण्याविषयी नियम आहेत. ते व्यवस्थित पॅकींग केलेले असेल तरच खरेदी करावेत. गळती होणाºया पॅकींगची खरेदी करू नये, असे कृषी विभागाने सांगितले.
कीटकनाशके साठवताना शेतकºयांनी राहत्या घरात कीटकनाशके ठेवू नयेत. राहत्या घरापासून दूर सुरक्षित स्थळी कीटकनाशकांची साठवणूक करावी. कीटकनाशके त्यांचे मूळचे पॅकींग, वेष्टणात ठेवावीत. कीटकनाशकांचे मूळ पॅकींगमधून कीटकनाशके इतर पॅकींगमध्ये ओतून घेऊ नये. कीटकनाशके, तणनाशके यांची वेगवेगळे साठवणूक करावी. ज्या ठिकाणी कीटकनाशके ठेवण्यात आली तेथे धोक्याच्या सूचना लिहून ठेवाव्यात व लहान मुले तेथे पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. कीटकनाशके साठवताना त्यांचा वातावरणाशी थेट संबंध येणार नाही, याची दक्षता बाळगावी. किटकनाशके सूर्यप्रकाश पावसाचे पाणी तथा हवेची झुळूक यांचे संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
हाताळणी करताना ही घ्यावी काळजी
कीटकनाशके हाताळणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. वाहतूक करताना कीटकनाशके स्वतंत्र पिशवित ठेवातीत. बाजार हाट करताना अन्नपदार्थ जनावरांची वैरण अथवा खाद्यपदार्थ सोबत नेणे टाळावे. कीटकनाशकांचे पॅकींग मोठ्या प्रमाणात डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर वाहून नेवू नये.
दाणेदार औषधी पाण्यात विरघळू नये
कीटकनाशकांच्या लेबलवरील सूचनांचे वाचन करून समजून घ्यावे. गरजेनूसार व गरजे इतकेच द्रावण तयार करावे. दाणेदार औषधे आहे तशीच वापरावीत. पाण्यात विरघळू नयेत. स्प्रेपंपाची टाकी भरताना औषधे सांडवू नये. फवारणी करताना शरीरास अपायकारक ठरतील, असे कामे करू नयेत. फवारणीच्या वेळेत तंबाखू खाऊ नये, असे कृषी विभागाने सांगितले.
द्रावण तयार करताना संरक्षक साधनांचा वापर हवा
कीटकनाशके फवारणीचे द्रावण तयार करताना शेतकऱ्यांनी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाणी अथवा साचलेल्या पाण्याचा वापर करू नये. सरंक्षण साहित्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करू नये. जसे हातमोजे, मास्क, टोपी, अ‍ॅप्रण, पूर्ण पँट, गॉगलचा वापर करावा. कीटकनाशके शरीराच्या कोणत्याही भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले नाक, डोळे, कान व हात उडणाऱ्या औषधांपासून संरक्षित राहतील, याची संपूर्ण काळजी घ्यावी. वापरा विषयक सूचनांचे अवलोकन केल्याशिवाय मिश्रण तयार करू नये.

Web Title: Vigilance is important in handling pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.