अडगावच्या ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:37 PM2017-08-23T22:37:12+5:302017-08-23T22:37:39+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी .....

The villagers of Adgaon were in the room of CEOs | अडगावच्या ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात ठिय्या

अडगावच्या ग्रामस्थांचा सीईओंच्या दालनात ठिय्या

Next
ठळक मुद्देआ. जगतापांचे नेतृत्व : ग्रामसेवक, रोजगारसेवकावरील कारवाई मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव बु। येथील ग्रामपंचायतीत राजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक व रोजगार सेवकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात गावकरी जिल्हा परिषदेवर धडकले. आ.वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या देत ग्रामस्थांनी नियमबाह्य कारवाई रद्द करण्याची मागणी रेटून धरली.
अडगाव ग्रामपंचायतीमध्ये रोहयोच्या कामात अपहार झाल्याची तक्रार येथील सरपंचांनी केली होती. त्यानुसार याप्रकरणाची चौकशी झेडपी प्रशासनाने केल्यानंतरही कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान सरपंच व काही सहकाºयांनी स्वातंत्र्यदिनी कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केले. त्यानुसार प्रशासनाने ग्रामसेवक नीलेश भुसारी यांच्यावर निलंबनाची, तर रोजगारसेवक मोरेश्वर दिवटे यांना बडतर्फ केले होते. मात्र, राजकीय दबावातून ग्रामसेवकांवर ही कारवाई केल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.
कोणताही अपहार केला नसताना ग्रामसेवक नीलेश भुसारी व रोजगारसेवक मोरेश्वर दिवटे यांच्यावर विनाकारण कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, सरपंच यांनी केलेली रोजगारसेवकांची तक्रार राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप गामस्थांनी केला.
उशिरापर्यंत नागरिकांचा ठिय्या
त्यामुळे ग्रामपंचायतीत पार पडलेल्या ग्रामसभेतील ठरावात दिवटे यांनाच रोजगार सेवक म्हणून कायम ठेवावे, असा निर्णय घेतल्याचे यानिवेदनात म्हटले आहे. या रोजगार सेवकांला सेवेत परत घेईपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. ग्रामसभेत झालेला ठराव लेखीस्वरूपात जोपर्यंत प्राप्त होणार नाही, तोपर्यंत यावर निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट मत सीईओंनी मांडले. दरम्यान दुपारी उशिरापर्यंत हा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे निर्णयाच्या प्रतीक्षेत नागरिक बसून होते. या आंदोलनात अडगावचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: The villagers of Adgaon were in the room of CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.