कार्यालयातच तलाठ्याचे महिलेसोबत अश्लील चाळे, नागरिकांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:24 PM2021-11-26T13:24:14+5:302021-11-26T13:38:39+5:30

नांदगाव तालुक्यातील एका गावातील तलाठी कार्यालयात वारांगणेला बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा घाट घालणाऱ्या तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला ग्रामस्थांनी चोप दिला.

villeger beaten talathi for doing unethical things in office in nandgaon khandeshwar | कार्यालयातच तलाठ्याचे महिलेसोबत अश्लील चाळे, नागरिकांनी दिला चोप

कार्यालयातच तलाठ्याचे महिलेसोबत अश्लील चाळे, नागरिकांनी दिला चोप

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यालयात वारांगणा बोलावल्याचा आरोपसहकारी पोलिसांच्या ताब्यात, तीन पसार

अमरावती : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तलाठी कार्यालयात वारांगणेला बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा घाट घालणाऱ्या तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला ग्रामस्थांनी चोप दिला. त्यानंतर त्यांना मंगरूळ चव्हाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर हा घटनाक्रम घडला.

सूत्रांनुसार, तलाठ्याने आपल्या कार्यालयात वारांगणा बोलावली होती. याची कुणकुण लागताच ग्रामस्थांनी हे ठिकाण गाठले. यावेळी तलाठी व चार अनोळखी पुरुष कार्यालयात होते. ‘शराब’ व ‘शबाब’ची व्यवस्थाही करण्यात आली होती. दरम्यान, अचानक आलेल्या नागरिकांमुळे भांबावलेल्या तलाठ्याला काहीही उपाय करता आले नाहीत. नागरिकांनी या सर्वांना जाब विचारत काही प्रमाणात चोपसुद्धा दिला. या गदारोळात तिघांंनी पळ काढला, तर महिला, तलाठी व त्याचा आणखी एक सहकारी हे नागरिकांच्या ताब्यात आले. नागरिकांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही.

पळालेले कोण?

तलाठ्यासोबत कार्यालयात असलेले व गदारोळानंतर पलायन करणारे तिघे कोण, याबाबत तलाठी व त्याच्यासोबतच्या सहकाऱ्याला काहीही सांगता आले नाही. त्यांची नावेदेखील माहिती नाहीत, असे अजब उत्तर दस्तुरनगर, अमरावती असा रहिवासी पत्ता सांगणाऱ्या तलाठ्याच्या सहकाऱ्याने दिले. दुसरीकडे सायंकाळी ७ पर्यंत शिंगोली गावाची यादी करीत होतो, असे थातूरमातूर उत्तर तलाठ्याने दिले.

मंगरूळ पोलिसांच्या स्वाधीन

ग्रामस्थांनी पकडलेल्या तिघांना बुधवारी रात्री दाखल झालेल्या मंगरूळ चव्हाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतलेल्यांची सुटका झाली. तालुक्यात या घटनेने काही वेळ ‘टीआरपी’ मिळविला.

दरम्यान, तेथील तलाठी कार्यालयात घडलेला प्रकार नवा नाही. येथे नेहमीचे ‘रंगीन’ माहोल असतो, असे या प्रकरणाच्या अनुषंगाने पुढे आले आहे.

Web Title: villeger beaten talathi for doing unethical things in office in nandgaon khandeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.