लॉकडाऊनचे उल्लंघन, मोर्शीत दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:49+5:302021-04-30T04:16:49+5:30
कोरोना काळात राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन घोषित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, म्हणून दररोज सकाळी ...
कोरोना काळात राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन घोषित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, म्हणून दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. काही दुकानदार प्रशासनाला न जुमानता दुकानाचे शटर उघडे करून व्यवसाय करीत आहे. यात कापड दुकानदार, रेडिमेड ड्रेसेस, जनरल स्टोर्स, जोडे व चपलांची दुकाने, स्टील दुकाने हार्डवेअर दुकाने सर्रास नियमांचे उल्लंघन करीत आहे. मोर्शी शहरात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या दोन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एक कापड दुकान सील करण्यात आले. गुरुवारी सकाळी मोर्शी नगर परिषदेचे विविध कर्मचारी तसेच तहसीलदार सिद्धार्थ मोरे, ठाणेदार संजय सोळंके यांनी बाजारात फेरफटका मारला असता साबू कॉम्प्लेक्सनजीक एका कापडाच्या दुकानाला सील करण्यात आले. तर अन्य दोन दुकानात सोशल डिस्टंसिंग आढळून न आल्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल्सच्या दुकानाला चार हजार रुपये दंड तर आॅइल पेंट विक्री करणाºया दुकानदाराकडून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोना च्या काळात राज्य सरकारतर्फे लॉकडाउन घोषित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, म्हणून दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. काही दुकानदार प्रशासनाला न जुमानता दुकानाचे शटर उघडे करून ग्राहकी करत आहे. यात कापड दुकानदार, रेडिमेड ड्रेसेस, जनरल स्टोर्स, जोडे व चपलांची दुकाने, स्टील दुकाने हार्डवेअर दुकाने सर्रास नियमांचे उल्लंघन करीत आहे.