नियमांचे उल्लंघन, वाहतूक पोलिसांनी वसूल केला ४९ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:51+5:302021-07-10T04:10:51+5:30
अमरावती : लॉकडाऊनमध्ये विशेष मोहीम राबवून विनामास्क वाहन चालविणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करून ...
अमरावती : लॉकडाऊनमध्ये विशेष मोहीम राबवून विनामास्क वाहन चालविणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करून वाहतूक पोलिसांनी ४९ लाख ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. याकरिता पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी पुढाकार घेऊन कारवाईचे निर्देश दिले होते.
शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईच्या मोहिमेदरम्यान विनामास्क फिरणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कलम १७९(१) मोटर वाहन कायदा अन्वये ३६७२ केसेस करून १८ लाख ३६ हजारांचा दंड आकरण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कलम २४ (२) मोटर वाहन कायदा अन्वये १५५११ केसेस करून ३१ लाख २२ हजाराचा दंड आकारला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, उपआयुक्त शशिकांत सातव,उपआयुक्त विक्रम साळी, एसीपी (वाहतूक) किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी केली.