‘व्हीआयपी’ फाईलला फुटले पाय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:12 PM2018-05-05T22:12:50+5:302018-05-05T22:12:50+5:30
कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याच्या नियुक्ती फाईलला पाय फुटल्याचा धक्कादायक प्रकार सामान्य प्रशासन विभागात (जीएडी) उघड झाला आहे. याबाबत केलेला खुलासासुद्धा धक्कादायक असून, फाईलच्या गोपनियतेबाबत जीएडी किती बिनधास्त आहे, हेसुद्धा यातून अधोरेखित झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याच्या नियुक्ती फाईलला पाय फुटल्याचा धक्कादायक प्रकार सामान्य प्रशासन विभागात (जीएडी) उघड झाला आहे. याबाबत केलेला खुलासासुद्धा धक्कादायक असून, फाईलच्या गोपनियतेबाबत जीएडी किती बिनधास्त आहे, हेसुद्धा यातून अधोरेखित झाले आहे. ती महत्त्वपूर्ण फाईल अद्यापपर्यंत जीएडीला सापडलेली नाही.
शहर अभियंत्यासह अन्य सेवानिवृत्त अभियंत्याच्या कंत्राटी नियुक्तीची फाईल जीएडीमध्ये असणे अभिप्रेत आहे. मात्र ती महत्त्वपूर्ण फाईल मागील चार महिन्यांपासून जीएडीत नसल्याची कबुली अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांनी दिली आहे. सदार यांचा कार्यकाळ केव्हा संपुष्टात येत आहे, अशी विचारणा केल्यानंतर सदारांच्या मुदतवाढीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ती फाईल कुठे याबाबतही अधीक्षकांनी अनभिज्ञता दर्शवित अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर सदार यांच्या मुदतवाढीची फाईल बांधकामकडून चालल्याने ती त्यांच्याकडेच असावी, अशी शक्यता मिसाळांनी व्यक्त केली. मात्र, फाईल कुठे? याबाबत ते ठामपणे सांगू शकले नाहीत. आस्थापना व कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचा संपूर्ण लेखाजोखा जीएडीत असणे अभिप्रेत आहे. कंत्राटी नियुक्ती, मुदतवाढ जीएडीकडून प्रस्तावित केल्या जातात. मात्र, जीवन सदारांसह जाधव, देशमुख, कुळकर्णीची नियुक्ती व मुदतवाढीचे दस्तावेज असलेली मूळ फाईल जीएडीतून गायब झाली आहे. त्यामुळे सदार यांना कोणत्या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, हे मिसाळ सांगू शकले नाहीत. सदार यांना ८ जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती जीएडीतील अन्य कर्मचाºयाने दिली.
डाव कुणाचा?...: अभियंता जीवन सदार यांचा कंत्राटी कार्यकाळ ८ जून २०१८ ला संपूष्ठात येत आहे. जीएडीमधून गहाळ झालेल्या त्या फाईलमध्ये सदार यांची तीन वर्षापूर्वीच्या मुळ नियुक्तीपासून अन्य कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याचे दस्तावेज आहेत. सदार यांना पुन्हा घेण्याचा खटाटोप होण्याची शक्यता अधिक आहे. त्या पार्श्वभूमिवर त्या महत्वपूर्ण फाईलकडे जीएडीने कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे.
सदारांच्या मुदतवाढीबाबतची ती फाईल चार महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता-१ कडील कंत्राटी अभियंत्याने नेली होती. ती त्यांच्याकडेच असेल.
- दुर्गादास मिसाळ,
अधीक्षक, सामान्य प्रशासन