व्हीआयपींना अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:41 PM2019-03-09T22:41:25+5:302019-03-09T22:41:53+5:30
पंचवटी ते इर्विन चौक मार्गातील विभागीय क्रीडा संकुलाच्या व्हीआयपी गेटपुढेच वाहन दुरुस्ती व सजावटीची कामे चालतात. वाहनांच्या या गर्दीचा फटका बसून विभागीय क्रीडा संकुलात येणाऱ्या जिल्ह्यातील व बाहेरील व्हीआयपींच्या वाहनांना अपघाताची भीती सदोदित वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने क्रीडा उपसंचालकांनी अमरावती वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षकांना सदर वाहनांवर कारवाईचे पत्रदेखील दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंचवटी ते इर्विन चौक मार्गातील विभागीय क्रीडा संकुलाच्या व्हीआयपी गेटपुढेच वाहन दुरुस्ती व सजावटीची कामे चालतात. वाहनांच्या या गर्दीचा फटका बसून विभागीय क्रीडा संकुलात येणाऱ्या जिल्ह्यातील व बाहेरील व्हीआयपींच्या वाहनांना अपघाताची भीती सदोदित वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने क्रीडा उपसंचालकांनी अमरावती वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षकांना सदर वाहनांवर कारवाईचे पत्रदेखील दिले आहे.
विभागीय क्रीडा संकुलाच्या तळमजल्यावरील गाळा क्रमांक १६ राजकुमार अग्रवाल यांनी भाडेपट्ट्याने घेऊन कार श्रुंगार हे प्रतिष्ठान थाटले आहे. त्यांनी दुकानापुढे व्यवसाय चालवावा, असे अपेक्षित असताना सजावटीसाठी येणाºया कार व एसयूव्ही वाहने विभागीय क्रीडा संकुलाच्या पंचवटीकडील व्हीआयपी प्रवेशद्वारापुढे उभी केली जातात. नावाप्रमाणेच व्हीआयपींच्या प्रवेशासाठी ्असल्याने हे प्रवेशद्वार इतर वेळी बंद ठेवण्यात येते. त्याचा फायदा घेत एकाच वेळी चार ते पाच वाहनांची सजावट सदर सदर प्रवेशद्वारासमोर केली जात असल्याचेही चित्र पाहावयास मिळते. यामुळे येथे वाहने व माणसांची वर्दळ कायम असते. वास्तविक, विभागीय क्रीडा संकुलात पाच जिल्ह्यांचा कारभार हाताळला जात असल्याने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय तसेच अन्य व्हीआयपी केव्हाही या मैदानाकडे रोख करू शकतात. अशा स्थितीत त्यांना सामना करावा लागतो, तो व्हीआयपी दारापुढे लागलेल्या वाहनांचा. या वाहनांच्या गर्दीत अपघात केव्हाही घडू शकतो, अशी भीती व्यक्त निर्माण झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, वाहनांच्या सजावटीनंतर राहिलेले साहित्य तसेच इतर कचरा गोळा करून न ठेवता, प्रवेशद्वारासमोरच टाकला जातो. वाºयाबरोबर हा कचरा इतरत्र पसरत जातो. कचरा मागे सोडल्याने प्रवेशद्वारापुढे कमालीची घाण निदर्शनास येते. मैदानात सरावासाठी येणाºया मुलांना हा कचरा अडथळा निर्माण होतो. याबाबत क्रीडा संकुल विभागाकडून सदर दुकानमालकाला वारंवार तोंडी सूचना देऊनही वाहने मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी केली जात आहेत. यामुळे अखेर क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी अमरावती शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षकांना विभागीय क्रीडा संकुलाच्या व्हीआयपी गेटपुढे लागणाºया वाहनांवर कारवाई करण्याबाबत पत्र दिले. यावर वाहतूक शाखा किती जलद प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुकानमालक कुणालाच जुमानेना
क्रीडा संकुल प्रशासनाने दुकानमालक राजकुमार अग्रवाल यांना आपल्या जागेवर व्यवसाय करण्याबाबत वारंवार सांगितले तरी त्यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक शाखेला ते कितपत प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विभागीय क्रीडा संकुलासमोरील व्हीआयपी प्रवेशद्वार व थेट रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. व्हीआयपींना कोणता त्रास होऊ नये, याबाबत वाहतूक शाखेशी कारवाईबाबत पत्रव्यवहार केला आहे.
- प्रतिभा देशमुख,
क्रीडा उपसंचालक