व्हायरल फिव्हर, रुग्णालये हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:36 AM2019-08-02T01:36:57+5:302019-08-02T01:37:21+5:30

गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

Viral fever, hospitals housefull | व्हायरल फिव्हर, रुग्णालये हाऊसफुल्ल

व्हायरल फिव्हर, रुग्णालये हाऊसफुल्ल

Next
ठळक मुद्देकाळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला : शासकीय, खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची धाव

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ न कळत खाण्यात आल्याने सद्यस्थितीत विविध आजाराची लागण होत असल्याने शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच पाणी पिताना काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. या दिवसांत व्हायरल डिसीजच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होत आहे.
मागील पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण असून, सूर्यदर्शन दुर्लभ झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच ठिकठिकाणी नाल्या तुंबल्याने विविध आजारांची लागण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ते २१ जुलै दरम्यान १५४ रुग्ण डायरियाचे, तीन न्युमोनियाचे, दोन कावीळ, ११८ रूग्णांनी टायफाईडचे उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सदर रूग्णांनी जिल्हा सामान्य रूग्णालायत यातील काही रूग्णांवर अद्यापही उपचार सुरूच असून, नव्याने दाखल झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत व्हायरल डिसीजचे रूग्ण तपासणीकरिता येत असल्याची महिती खासगी डॉक्टरांनी दिली. दूषित पाण्यामुळे अतिसाराच्या रूग्णांतही वाढत होत आहे. या दिवसांत पाईपलाईनच्या लिकेजसमुळे नागरिकांच्या घरापर्यंत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यातून अनेक जलजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे सर्वाधिक चांगले, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

अशी घ्या काळजी
सर्दी, खोकला व ताप ज्यांना असेल त्यांनी शिंकताना रूमाल वापरावा, ताप असेल तर घरी आराम करावा, डायरियापासून वाचण्यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, बाहेरील पाणी पिऊ नये, पाणी उखळून थंड करून प्यावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होत असून घरातील पाणी या दिवसांत निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.

सर्दी, ताप व खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आजारी असल्यास ताप अंगावरून न काढता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्सक अमरावती

Web Title: Viral fever, hospitals housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य