‘प्रहार’ने जाळला वीरेंद्र जगताप यांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:01:01+5:30
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचा आनंद साजरा करताना अमरावती येथे विश्रामगृह परिसरात सहकार पॅनलचे नवनियुक्त संचालक वीरेंद्र जगताप यांनी उत्साहाच्या भरात राज्यमंत्री बच्चू कडू यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीरेंद्र जगताप यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींबाबत अपशब्द काढल्याचा आरोप करीत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा प्रतिकात्मक पुतळा चांदूर बाजारात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाळून निषेध केला. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हा दाखल करून त्वरित कारवाईची मागणीसुद्धा कार्यकर्त्यांनी केली.
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचा आनंद साजरा करताना अमरावती येथे विश्रामगृह परिसरात सहकार पॅनलचे नवनियुक्त संचालक वीरेंद्र जगताप यांनी उत्साहाच्या भरात राज्यमंत्री बच्चू कडू यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीरेंद्र जगताप यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुकाप्रमुख संतोष किटुकले यांच्या नेतृत्वात चांदूर बाजार पोलिसात तक्रार करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.तालुक्यातील अनेक कार्यकर्ते अमरावती येथे धडकले व कठोर कारवाईची मागणी करीत फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संतोष किटुकलेंसह नगराध्यक्ष नितीन कोरडे, उद्धव ठाकरे, निखिल ठाकरे, मंगेश इंगोले, विक्रम कडू, प्रदीप बंड, सुरेश गणेशकर, गणेश पुरोहित, विशाल बंड, नीलेश वाटाणे, गोलू ठाकूर, मो. रिजवान उपस्थित होते.