एसओएसतर्फे आभासी कला प्रदर्शनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:59+5:302021-05-01T04:11:59+5:30
इयत्ता तिसरी ते आठवीच्या एकूण २००० चित्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. या आयोजनाचे लिम्का बूककरिता नामांकन करण्यात आले ...
इयत्ता तिसरी ते आठवीच्या एकूण २००० चित्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. या आयोजनाचे लिम्का बूककरिता नामांकन करण्यात आले आहे.
----------------------
शिवाजी शाळेत वक्तृत्व स्पर्धा
मोर्शी (अमरावती) : स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती ऑनाईन वक्तृत्व स्पर्धेने पार पडली. मुख्याध्यापक एस.आर. देशमुख, पर्यवेक्षक आर.एम. देशमुख, व्ही.जी. गावंडे, व्ही.ए. कानफाडे, ए.बी. चौधरी, यू.एन. गिद, मनीष केचे, सारंग जाणे उपस्थित होते. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. संचालन पी.व्ही. नवरे, प्रास्ताविक व्ही.एम. रोकडे व आभार प्रदर्शन एस.व्ही. राईकवार यांनी केले.. एस.सी. टोळे, एस.व्ही. बाजारे, व्ही.बी. ठाकरे यांनी परिश्रम घेतले.
-----------
अमरावती महापालिकेत राष्ट्रसंतांची जयंती
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती ३० एप्रिल रोजी अमरावती महानगरपालिकेत पार पडली.
महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती सचिन रासने, महापालिका
आयुक्त प्रशांत रोडे, सभागृहनेता तुषार भारतीय, गटनेता चेतन पवार,
उपआयुक्त सुरेश पाटील, मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे, नगर सचिव मदन
तांबेकर, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदी उपस्थित होते.