पोलीस आयुक्तालयात व्हिजिबल पोलिसिंग; ‘गौरक्षण’ला नवी पोलीस चाैकी; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
By प्रदीप भाकरे | Published: November 5, 2023 03:15 PM2023-11-05T15:15:04+5:302023-11-05T15:15:28+5:30
हिंदू स्मशान भूमी, गडगडेश्वर व पुढे गौरक्षण भागात वाढलेल्या नागरी वसाहती पाहता तेथे पोलीस चौकी असावी, असा मानस राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी व्यक्त केला होता. त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे.
अमरावती: राजापेठ ठाण्याच्या हददीतील हिंदू स्मशान भुमीजवळील गौरक्षण भागात नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी त्या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. त्या चौकीत २४ बाय ७ पोलीस अंमलदार उपस्थित राहणार आहेत. हिंदू स्मशान भूमी, गडगडेश्वर व पुढे गौरक्षण भागात वाढलेल्या नागरी वसाहती पाहता तेथे पोलीस चौकी असावी, असा मानस राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी व्यक्त केला होता. त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे.
पोलीस उपायुक्त सागर पाटील व विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, शिवाजी बचाटे व मनिष ठाकरे, हिंदू स्मशान भुमीचे अध्यक्ष आर. बी. अटल, सुरेश रतावा, एचयूपीएम येथील हेल्पलाईनचे सदस्य, शांतता समिती, महिला समिती, पोलीस मित्र समिती सदस्य, राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर, कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे, भातकुलीचे ठाणेदार प्रविण वांगे, पोलीस निरिक्षक स्वाती पवार, क्राईम पीआय आसाराम चोरमले व राहुल आठवले हजर होते.
तत्काळ पोलीस मदत
शहरातील नागरिकांना पोलिसांची तात्काळ मदत पोहचविण्याने उददेशाने गौरक्षण चौकी उभारण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. तथा पोलीस विभागातील कार्यपध्दतीची माहिती दिली. गौरक्षण चौकीत नोंदणी रजिस्टर ठेवण्यात आले असून, बिट अधिकारी व अंमलदार तेथे गस्तीदरम्यान भेटी देतील. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरिक्षक सोनू झामरे तर प्रास्ताविक पोलीस उपायुक्त विक्रम साळी तर सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांनी आभार मानले.